खाण खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याच्या प्रकरणात क्लॉड आल्वारिस यांना सशर्त जामीन   

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 10:32 PM2018-06-29T22:32:31+5:302018-06-29T22:43:57+5:30

खाण संचालनालयाच्या येथील कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या प्रकरणात गोवा फाउंडेशनचे संस्थापक तथा ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी क्लॉड आल्वारिस यांना येथील सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Claude Alvaris gets conditional bail in the case of the office of the mining department | खाण खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याच्या प्रकरणात क्लॉड आल्वारिस यांना सशर्त जामीन   

खाण खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याच्या प्रकरणात क्लॉड आल्वारिस यांना सशर्त जामीन   

Next

पणजी -  खाण संचालनालयाच्या येथील कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या प्रकरणात गोवा फाउंडेशनचे संस्थापक तथा ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी क्लॉड आल्वारिस यांना येथील सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. येत्या २ ते ५ जुलै या कालावधीत रोज सकाळी १0 ते दुपारी १२ या वेळेत शहर पोलिस स्थानकात हजेरी लावून चौकशीत पोलिसांना सहकार्य करावे तसेच या प्रकरणातील साक्षीदारांना धमकावू नये, असे त्यांना बजावण्यात आले आहे. दहा हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर त्यांना हा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. 

खाण संचालनालयाला टाळे ठोकल्याच्या प्रकरणात क्लॉड यांच्यावर शहर पोलिसांनी भादंसंच्या कलम ३४१, ३४२ व ३५३ (३४ सह) गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यानंतर क्लॉड यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायाधीश ईर्शाद आगा यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. 

त्याआधी गुरुवारी क्लॉड यांचे वकील यज्ञेश कोटकर यांनी युक्तिवाद करताना पोलिसांनी घटनेनंतर तब्बल पाच दिवसांनंतर गुन्हा नोंदविला आहे याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. आपल्या अशिलास कोठडीत घेऊन चौकशी करण्याएवढा गंभीर गुन्हा नाही असा दावाही कोटकर यांनी केला. सरकारच्यावतीने अ‍ॅड. पूनम भरणे यांनी युक्तिवाद केला. टाळे ठोकताना क्लॉड यांच्यासोबत आणखी कोण होते त्या व्यक्तींची तसेच साहित्याची माहिती घेण्यासाठी त्यांची कोठडी चौकशी होणे आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे होते. 

 खाण घोटाळा प्रकरणात सातत्याने कारवाईची मागणी करणारे आणि खाण मालकांकडून करण्यात आलेल्या कायद्याच्या उल्लंघनाच्या प्रकरणात न्यायालयीन लढा देत आलेले क्लॉड यांनी खाण खात्याच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यासाठी खात्याच्या येथील कार्यालयाला टाळे ठोकले होते.  त्यावेळी त्यांच्याबरोबर इतर काही लोकही होते. अभिनव पध्दतीने निषेध व्यक्त करताना त्यांनी बॅनर व इतर साहित्यही आणले होते. 

क्लॉड यांच्या वतीने युक्तिवाद करताना त्यांच्या वकिलाने पोलिस क्लॉड यांना अटक करण्यासाठी खोटे आरोप त्यांच्यावर करीत असल्याचा दावा न्यायालयात केला होता. क्लॉड हे ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी असून खाणमालकांच्या प्रत्येक बेकायदा उल्लंघनाला त्यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे खाण लॉबी त्यांच्या विरोधात आहे आणि त्यांच्याच दबावाला बळी पडून पणजी पोलीस त्यांना अटक करण्यासाठी खटाटोप करीत असल्याचाही आरोप होता.  

Web Title: Claude Alvaris gets conditional bail in the case of the office of the mining department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.