विद्यार्थ्यांसाठी आता चिल्ड्रन फिल्म फेस्टीवल; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 02:41 PM2023-10-13T14:41:18+5:302023-10-13T14:41:47+5:30

विद्यार्थी हे देशाची ताकद आहे त्यांना लहान वयात चांगले प्रशिक्षण मिळाले तर ते चांगले नागरिक घडू शकतात

Chief Minister Dr. Children's Film Festival for students now. Pramod Sawant | विद्यार्थ्यांसाठी आता चिल्ड्रन फिल्म फेस्टीवल; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

विद्यार्थ्यांसाठी आता चिल्ड्रन फिल्म फेस्टीवल; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

पणजी: विद्यार्थ्यांना विकसित करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. विविध महाेत्सवापासून, मनोरंजनाचे कार्यक्रम विद्यार्थ्यासाठी आयोजित केले जातात. आता विद्यार्थ्यासाठी चिल्ड्रन फिल्म फेस्टीवल आयोजित केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. सनशाईन विद्यालयात आयाेजित केलेल्या साहित्य महाेत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

विद्यार्थी हे देशाची ताकद आहे त्यांना लहान वयात चांगले प्रशिक्षण मिळाले तर ते चांगले नागरिक घडू शकतात. केंद्र सरकार पासून राज्य सरकार यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. गाेव्यात सरकारतर्फे विविध कार्यक्रम राबविले जातात. यात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणिय असते. गाेव्यात विज्ञान महोत्सव, डी. डी कोंसबी महोत्सव, आंतराष्ट्रीय चित्रपट महाेत्सव सेरेंडीपिटी महाेत्सव असे विविध महाेत्सव प्रत्येक वर्षी होत असतात. यातून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळत असते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. मुलांना चांगले घडवायचे असेल तर पालकांनी त्यांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. सकाळी लवकर उठणे. व्यायाम करणे तसेच चांगली पुस्तके वाचणे अशा काही सवयी विद्यार्थ्यांना यशस्वी बानवितात. देशातील तसेच राज्यातील आज अनेक लाेक जागतिक स्थरावर देशाच नाव अव्वल करत आहेत. त्यांना लहानपणापासून िमिळालेल्या चांगल्या सवयीमुळे ते असे घडले आहे. असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

Web Title: Chief Minister Dr. Children's Film Festival for students now. Pramod Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.