मुख्य खाण घोटाळ्यात आरोपपत्र दाखल; दिगंबर कामत, व्ही काडणेकर प्रमुख आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 09:36 PM2018-02-03T21:36:06+5:302018-02-03T21:36:14+5:30

खाण घोटाळयातील मुख्य प्रकरणात विशेष तपास पथकाकडून पणजी विशेष सत्र न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

charge sheet filed in main mining case | मुख्य खाण घोटाळ्यात आरोपपत्र दाखल; दिगंबर कामत, व्ही काडणेकर प्रमुख आरोपी

मुख्य खाण घोटाळ्यात आरोपपत्र दाखल; दिगंबर कामत, व्ही काडणेकर प्रमुख आरोपी

Next

पणजी: खाण घोटाळयातील मुख्य प्रकरणात विशेष तपास पथकाकडून पणजी विशेष सत्र न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३५ कोटी रुपये घोटाळ््याच्या या प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, खाणमालक वैकुठराव काढणेकर आणि खाण खात्याच्या अधिकाºयांना प्रमुख संशयित करण्यात आले आहे.
खाणीला बेकायदेशीरपणे कंडोनिशन आॅफ डिलेखाली खाण सुरू करण्याचा परवाना देण्यात आल्याचे आणि त्यात माजी मुख्यमंत्री कामत आणि खाण अधिकाºयांवर ठपके ठेवण्यात आले आहे. खाण मालक, तत्कालीन खाण मंत्री आणि खाण अधिकारी यांच्या संगनमताने हा घोटाळा केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. खाण खात्यातील अधिकाºयांची अरोपी म्हणून नोंद करण्यात आली आहेत त्यात भूगर्भ शस्त्रज्ञ  एटी डिसोझा, निवृत्त सह भूगर्भशास्त्रज्ञ हेक्टर फर्नांडीस यांचा समावेश आहे.  मॅग्नम मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेडचे रविंद्र प्रकाश आणि प्रशांत साहू यांनाही आरोपी बनविण्यात आले आहे.  या घोटाळ्यात सरकारला १३५ कोटी रुपयांचा फटका बसल्याचेही म्हटले आहे. 
खाण खात्याचे सचीव आयएएश अधिकारी राजीव यदुवंशी यांनी काढणेकर माईन्सला कंडोनेशन आॅफ डिले देऊ नका असे सांगितले होते. राज्य सरकारला तो अधिकार नसल्याचेही स्पष्ट केले होते. परंतु मुख्यमंत्री कामत यांनी आपले राजकीय अधिकार वापरून त्यांना कंडोनेशन डिले  मंजूर केल्याची जबानी यदुवंशी यांनी दिली आहे. शिवाय माजी खाण  संचालक जे बी भिंगी यांचीही साक्ष कामत यांच्या विरोधात नोंदविली गेली आहे. 
वास्तविक खाण घोटाळा हा ३५ हजार कोटी रुपयांचा असल्याचा शाह आयोगाचा दावा होता. परंतु त्यानंतर झालेल्या तपासातून मुख्यता चाटर्ड अकाउंटंटच्या छाननीतून हे नुकसान १३५ कोटी रुपये झाले असल्याचे आढळून आले आहे असे आरोपपत्रात एसआयटीने म्हटले आहे. अलिकडच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून गणला गेलेल्या या घोटाळ््यातील या प्रकरणाचा तपास निरीक्षक दत्तगुरू सावंत आणि उपनिरीक्षक सतीश पडवळकर यांनी केला.

Web Title: charge sheet filed in main mining case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.