गोव्यात कार्निव्हलची धूम ‘खा, प्या, मजा करा’चा संदेश : पर्यटकांनी लुटला आनंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 08:31 PM2018-02-10T20:31:28+5:302018-02-10T20:31:46+5:30

स्त्री भ्रृण हत्या, मुलगी वाचवा, सर्वधर्म समभाव असा संदेश देणारे, पर्यावरण वाचवा अशी जागृती करणा-या विविध चित्ररथांतून आणि राज्याच्या संस्कृतीचे दर्शन कार्निव्हलच्या मिरवणुकीतून घडले.

Carnival of Goa: 'Eat, Drink, Have Fun' message: Tourists enjoy looting | गोव्यात कार्निव्हलची धूम ‘खा, प्या, मजा करा’चा संदेश : पर्यटकांनी लुटला आनंद 

गोव्यात कार्निव्हलची धूम ‘खा, प्या, मजा करा’चा संदेश : पर्यटकांनी लुटला आनंद 

Next

पणजी - स्त्री भ्रृण हत्या, मुलगी वाचवा, सर्वधर्म समभाव असा संदेश देणारे, पर्यावरण वाचवा अशी जागृती करणा-या विविध चित्ररथांतून आणि राज्याच्या संस्कृतीचे दर्शन कार्निव्हलच्या मिरवणुकीतून घडले. राजधानी पणजी शहरातील गर्दीला वगळून पहिल्यांदाच पहिल्यांदाच झालेल्या या मिरवणुकीचा मिरामार ते दोनापावल रस्त्यावर झालेल्या या कार्निव्हलचा देशी-विदेशी पर्यटकांनी आनंद लुटला. ‘खा प्या मजा करा’ असा संदेश देणा:या किंग मोमोची राजवट शनिवारपासून गोव्यात सुरू झाली.

राज्य पर्यटन खात्याच्यावतीने सुरू झालेल्या कार्निव्हलचा शुभारंभ पर्यटन मंत्री बाबू आजगावकर, निलेश काब्राल, महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्यासह पर्यटन खात्याचे पदाधिकारी आणि नगरसेवकांची उपस्थिती होती. सायंकाळी साडेचार वाजता विज्ञान सेंटरपासून या मिरवणुकीस प्रारंभ झाला. किंग मेमोच्या भूमिकेत डान्सर ब्रुनो अझारेदो होते.

शांततेचा संदेश देत कार्निव्हलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणा:या मोमो यांच्या रथानंतर राज्याची संस्कृती दर्शविणारे, त्याचबरोबर बेटी बचाव बेटी पढाओ, मुलगी वाचवा, स्त्री भ्रूण हत्या यांचे संदेश देणारे आणि जागृती करणारे राज्यातील विविध भागातून आलेले चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. 

यंदाच्या मिरवणुकीत पर्यावरण वाचविण्याबरोबर समुद्री जिवसंपदा संरक्षण करण्याचा संदेश देणारा चित्ररथ लोकांचे आकर्षण ठरला. त्याचबरोबर नशाविरोधी संदेश देणारा, पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे ड्रंक इन ड्रायव्ह करणा:या लोकांची होणारी दशा दर्शविणारा, अग्निशामक दलात नव्याने समाविष्ट झालेला अत्याधुनिक बंब, हिप ऑन अँड हिप ऑपची सेवा, जीवरक्षकांचा समावेश, घुमट वाद्याची निर्मिती, बांधकाम करणारा पारंपरिक गवंडी, फेणीची निर्मिती, सर्वधर्म समभावाचा संदेश देणारा चित्ररथ लक्षवेधी ठरले. 

स्टॅटय़ू ऑप लिबर्टी, त्याचबरोबर मत्स्यगंधा, गोव्याच्या किंग काँगला भ्रष्टाचार, कचरा आणि वेश्या व्यवसायाने विळखा घातला आहे, असा संदेश देणारा ‘यंग स्टार’च्या चित्ररथाने सत्यस्थितीवर भाष्य केले. याशिवाय म्हापसा येथून आलेल्या ‘धिरयो’ची केलेली कलाकृतीही या मिवरणुकीची आकर्षण ठरली. अनेक चित्ररथांच्या समोर आणि मागे नृत्यासाठी शालेय मुलांचा समावेश अधिक होता. अनेक ग्रुपनी आणि मंडळांनी मुलांच्या माध्यमातून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत होते. विशेष म्हणजे एका चित्ररथात गोव्यातील विवाह सोहळाही चित्तारला होता. 

ट्रम्प, किम अन् ओबामा
कार्निव्हलमध्ये अनेक लोक विविध पोषाख घालून विविध संदेश देणाचा प्रयत्न करतात. एका व्यक्तीने अमेरिकेचा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळाही कल्पकतेने सादर केला होता. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यामध्ये उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किंग जोग-अन हे हाताहात घालून रस्त्यावर उतरले होते. तीन व्यक्तींनी त्यांचे मुखवटे घालून तिघांनाही शोभेल असा पेहराव करीत ट्रम्प, किम व ओबामा यांची नक्कल केली. हे तिघेही लोकांशी हस्तांदोलन करीत होते आणि त्यांना सेल्फी देत होते. 

83 चित्ररथांचा समावेश
राज्यभरातून या मिरवणुकीत 83 चित्ररथांचा समावेश करण्यात आला होता. पर्यटन खात्याने प्रत्येक चित्ररथांच्या मंडळांना पाण्याची सोय केली होती. मिरवणूक ज्या मार्गाने जाणार होती, तेथून पंधरा फुटांवर मंडप घालण्यात आले होते. याशिवाय पदपथांवर लोकांना बसण्यास व्यवस्था केली होती. पण मिरवणुकीतील चित्ररथ पाहण्यासाठी लोकांनी रस्ता दुभाजकावर गर्दी केल्याने पदपथावर बसलेल्यांना ते पाहता येत नव्हते. त्यामुळे अनेकांना रस्त्याच्या मध्यभागी जाऊन चित्ररथ पाहावे लागले. यात विशेष म्हणजे लहान मुलांना घेऊन आलेल्या पालकांची गैरसोय झाली. करंजाळे येथील पेट्रोल पंपार्पयत ही मिरवणूक होती, त्यामुळे लोकांना मिरवणूक पाहण्यात सोयीचे झाले. 

बोंडवाळ वाचवा!
सांताक्रूझ येथील बोंडवाळ तलाव वाचविण्याचे आवाहन करणारा चित्ररथही या मिवरणुकीत होता. सांताक्रूझ येथील लोकांनी बोंडवाळ तलाव वाचविण्यासाठी आंदोलन केले होते. या तलावाच प्रश्न सांताक्रूझ पंचायतीच्या ग्रामसभांतूनही चांगलाच गाजला होता. निसर्गसंपदेची देणं असलेला हा तलाव येथील भागाचे वैशिष्टय़ आहे. पण त्या तलावाला वाढत्या शहरीकरणामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा तलाव वाचवावा, अशी हाक देणारा चित्ररथ एक वैशिष्टय़ ठरला. 

Web Title: Carnival of Goa: 'Eat, Drink, Have Fun' message: Tourists enjoy looting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा