अग्निशामक दलातील जवानांच्या चित्तथरारक कसरती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 09:49 PM2018-04-14T21:49:59+5:302018-04-14T21:49:59+5:30

चित्तथरारक मल्लखांबांचे प्रात्यक्षिके, आग विझविण्याच्या कसरती, अग्निशामक दलाच्या जवानांची अग्निशमनावेळीची चपळाई, दलामध्ये समाविष्ट झालेली आणखी एका सात मजल्यार्पयत पोहोचू शकणा-या उंची शिडीचे वाहन, सुरक्षेची यंत्रसामग्रीचे प्रदर्शनाबरबरोच आग विझविण्याच्या रोबोटॅक सेवेच्या प्रात्यक्षिकांचा शनिवारी उपस्थित पालकांसह मुलांनीही मनमुराद आनंद लुटला.

The breathtaking exercise of firefighters | अग्निशामक दलातील जवानांच्या चित्तथरारक कसरती

अग्निशामक दलातील जवानांच्या चित्तथरारक कसरती

Next

पणजी : चित्तथरारक मल्लखांबांचे प्रात्यक्षिके, आग विझविण्याच्या कसरती, अग्निशामक दलाच्या जवानांची अग्निशमनावेळीची चपळाई, दलामध्ये समाविष्ट झालेली आणखी एका सात मजल्यार्पयत पोहोचू शकणा-या उंची शिडीचे वाहन, सुरक्षेची यंत्रसामग्रीचे प्रदर्शनाबरबरोच आग विझविण्याच्या रोबोटॅक सेवेच्या प्रात्यक्षिकांचा शनिवारी उपस्थित पालकांसह मुलांनीही मनमुराद आनंद लुटला. त्याचबरोबर अग्निशामक दलाने आपली सज्जतेचे दर्शन घडविले.  येथील अग्निशामक दलाच्या मुख्य कार्यालयाच्या मैदानावर शनिवारी राष्ट्रीय अग्निशामक सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा, जीएसआयडीसीचे उपाध्यक्ष व माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्य़ेकर, अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन, महापौर विठ्ठल चोपडेकर यांच्यासह नगरसेवक व दलातील अधिकारी वर्ग उपस्थित होता. 

अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रारंभी संचलनाने प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर जवानांनी मल्लखांबाच्या कसरती सादर केल्या. त्यानंतर आग विझविण्याच्या घटना घडल्यास दल किती सज्ज आहे, याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. दुचाकीवरून आग विझविणारे जवान, त्याचबरोबर अग्निशामक दलाचे बंब, आगीपासून सुरक्षा करणारा पेहराव परिधान करून दाखविण्यात आलेल्या प्रात्यक्षिके लोकांची उत्सुकता वाढविणारी होतीत. याशिवाय आगीच्या घटना घडल्यास जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी दलाने उपलब्ध करून दिलेली काही उपकरणांच्या मदतीने जवानांनी प्रात्यक्षिके दाखविली. यात वैशिष्टय़ ठरले ते रोबोटॅक आग विझविण्याच्या यंत्रचे प्रात्यक्षिक. रिमोटवर चालणा:या या यंत्रतून कमी जागेतून अडचणीच्या ठिकाणी प्रवेश करून आग विझविता येऊ शकते. हे यंत्र पाहण्यासाठी मुलांसह पालकांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर काही मुलांनी दलात नव्याने समावेश झालेल्या आणखी एका सात मजल्यार्पयत पोहोचू शकणा:या नव्या वाहनावर बसून आनंद लुटला. 

याप्रसंगी मुख्य सचिव शर्मा यांनी पूर्वीसारखी आग विझविण्याची यंत्रणा कालबाह्य झाल्याचे सांगितले. आता अत्याधुनिक यंत्रणा समाविष्ट होत असून, राज्यातील अग्निशामक दल अत्यावध बनत आहे. कोणत्याही आपत्कालीन घटना उद्भवल्यास अग्निशामक दलाला धाव घ्यावी लागते. त्यासाठी त्यांच्याकडे अत्याधुनिक यंत्रणा असावी लागते. अशोक मेनन यांनी दलाच्या कार्याचा आढावा घेतला. 

याप्रसंगी अग्निशामक दलाच्यावतीने राष्ट्रीय अग्निशामक सेवा दिनानिमित्त शालेय स्तरावर घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये 7 ते 10 वयोगटांत अश्मिता नाईक (मनोविकास इंग्लिश स्कूल मडगाव), रोहित हलदार (सीपीआय प्राथमिक शाळा, काणकोण), स्वजित देसाई (सवरेदय प्राथमिक शाळा, कुडचडे), 11 ते 14 वयोगटात प्रज्ञा बोरकर (महिला नूतन हायस्कूल मडगाव), सोहम भेंडे (सवरेदय हायस्कूल, कुडचडे), श्रृती नाईक (सवरेदय हायस्कूल, कुडचडे). त्याचबरोबर सुदिन हळर्णकर, जयराम शेटगावकर आणि आर. परब या जवानांना त्यांच्या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. 

Web Title: The breathtaking exercise of firefighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा