वास्को येथील व्यापारी सोळंकी अपहरणप्रकरणी तिघांवर आरोप निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 09:10 PM2018-12-13T21:10:50+5:302018-12-13T21:12:51+5:30

सर्व संशयितांविरुध्द प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध असून, ओळखपरेडीवेळी हरीशकुमार सोळंकी यांनी सर्व संशयितांची ओळखही पटविली आहे.

Allegations of three accused in Vasco's Solanki kidnapping case | वास्को येथील व्यापारी सोळंकी अपहरणप्रकरणी तिघांवर आरोप निश्चित

वास्को येथील व्यापारी सोळंकी अपहरणप्रकरणी तिघांवर आरोप निश्चित

Next

मडगाव: गोव्यातील वास्को शहरातील एक व्यापारी  व्यापारी हरिशकुमार सोळंकी यांच्या अपहरण प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिघांविरुध्द  आज आरोपनिश्चित केले आहे. वास्को पोलिसांतर्फे सरकारी वकील सुभाष देसाई यांनी बाजू मांडली. अब्दुल कादर (36, रा. वाडे - वास्को), सलीम खान ( 31, रा. बायणा , वास्को) व राजेंद्र कुमार कहार (27, अपरजेटी, मुरगाव) हे या अपहरण प्रकरणातील संशयित आहेत.


सर्व संशयितांविरुध्द प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध असून, ओळखपरेडीवेळी हरीशकुमार सोळंकी यांनी सर्व संशयितांची ओळखही पटविली आहे. अपहरण करताना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षिदारपण उपलब्ध असल्याने, तिघांही संशयितांविरुध्द आरोपनिश्चित करण्याची मागणी सरकारी वकील सुभाष देसाई यांनी केली होती.


भारतीय दंड संहितेच्या कलम 364 (अ) ( खंडणीसाठी अपहरण करणो), 120 ब ( पध्दतशीर कट रचून ती योजना अंमलात आणणो) या बददली वरील तीन संशयितांविरुध्द आरोपनिश्चित करण्यात आले आहे.


या घटनेची पाश्र्वभुमी अशी की, 8 जून 2018 रोजी रात्री दहा वाजता पिशी डोंगरी येथे सागर हार्डवेअर व प्लाय सेंटर हे दुकान बंद करुन हरिशकुमार सोंळकी चालत आपल्या घरी जाण्याच्या तयारीत असताना जीए -03- एच- 4555 क्रमाकांच्या कारने आलेल्या तीन अज्ञात युवकांनी त्याला कारमध्ये कोंबून त्याचे अपहरण केले, त्यानंतर अपहरणकत्र्यानी हरिशकुमार याचे भाउ डुंगाराम सोळंकी याला फोन करुन दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. दहा लाख रुपये न मिळाल्यास हरीशकुमार याला ठार मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी हरिशकुमार सोळंकी याचा कर्मचारी अरविंद भवरलाल चौधरी यांनी वास्को पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करताना सर्वत्र नाकाबंदी केली होती. त्यामुळे अपहरणकत्र्याना मुरगाव तालुक्याच्या बाहेर जाता आले नाही.

पोलिसांच्या तावडीत आपण सापडणार या भितीने संशयितांनी हरिशकुमार सोळंकी यांना उत्ताेर्डा येथे एका निर्जनस्थाळी सोडून मागाहून पोबारा केला होता. अब्दुल कादर व सलीम खान या दोघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आपल्या कुटुंबियांसमवेत मुबंईला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या राजेंद्र कुमार कहार याला पोलिसांनी थिवी येथे ताब्यात घेउन मागाहून रितसर अटक केली होती. मागच्या 9 जूनपासून संशयित कोठडीत आहेत. वास्को पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नालेस्को रापोझ यांनी या प्रकरणाचे तपासकाम केले होते.
 

Web Title: Allegations of three accused in Vasco's Solanki kidnapping case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.