‘कदंब’च्या ९00 चालकांना मिळणार धडे,  पेट्रोलियम कंझर्व्हेशन रीसर्चकडून शास्रशुद्ध वाहन चालविण्याचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 12:53 PM2018-01-27T12:53:40+5:302018-01-27T12:54:13+5:30

गोव्यात सार्वजनिक वाहतूक करणाºया कदंब परिवहन महामंडळाच्या ९00 चालकांना पेट्रोलियम कंझर्व्हेशन रीसर्च असोसिएशनकडून बसगाड्या चालविण्याचे शास्रशुध्द प्रशिक्षण दिले जाणार आहे

900 drivers of 'Kadamb' will get training | ‘कदंब’च्या ९00 चालकांना मिळणार धडे,  पेट्रोलियम कंझर्व्हेशन रीसर्चकडून शास्रशुद्ध वाहन चालविण्याचे प्रशिक्षण

‘कदंब’च्या ९00 चालकांना मिळणार धडे,  पेट्रोलियम कंझर्व्हेशन रीसर्चकडून शास्रशुद्ध वाहन चालविण्याचे प्रशिक्षण

googlenewsNext

पणजी : गोव्यात सार्वजनिक वाहतूक करणाºया कदंब परिवहन महामंडळाच्या ९00 चालकांना पेट्रोलियम कंझर्व्हेशन रीसर्च असोसिएशनकडून बसगाड्या चालविण्याचे शास्रशुध्द प्रशिक्षण दिले जाणार आहे. महामंडळाने इलेक्ट्रिक बसही आणली असून या बसचे उद्घाटन येत्या मंगळवारी ३0 रोजी होणार आहे. 

इंधनाची बचत करण्याच्यादृष्टीने कदंब चालकांना बसगाड्या चालविण्याचे शास्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी महामंडळाने पेट्रोलियम कंझर्व्हेशन रीसर्च असोसिएशन या संस्थेबरोबर समझोता करार केला आहे. कालांतराने खाजगी बसगाड्यांच्या चालकांनाही असेच प्रशिक्षण दिले जाईल.  इंधन बचतीचे उद्दिष्ट आहेच, शिवाय चालकांनी सुरक्षितपणे बसगाड्या चालवाव्यात हादेखिल हेतू आहे. 
पेट्रोलियम कंझर्व्हेशन रीसर्च असोसिएशनचे कार्यकारी संचालक अलोक त्रिपाठी यांनी हे प्रशिक्षण तीन दिवसांचे असेल, असे सांगितले. कदंबच्या ९00 चालकांना प्रशिक्षण देण्यात येईल. वाहन चालविण्याची चालकांची पध्दत तपासून ज्या काही त्रुटी आढळतील त्यावर मार्गदर्शन केले जाईल. त्रिपाठी म्हणाले की,‘ ताशी ४0 ते ४५ किलोमिटर वेगाने बस हाकली तर इंधन बºयापैकी वाचविता येईल. प्रशिक्षणात याच गोष्टींचा अंतर्भाव करण्यात येईल. ३१ मार्च २0१९ पर्यंत या कराराची मुदत आहे. तथापि ९00 चालकांचे प्रशिक्षण सहा महिन्यातच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पाच उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींची निवड करुन १६ जानेवारी २0१९ रोजी ‘सक्षम दिनी’ त्यांच सन्मान केला जाईल.

कॅब सेवेचाही विचार 
दरम्यान, ‘कदंब’ने टॅक्सी कॅब सेवा सुरु करण्यासाठी शक्याशक्यता अहवाल तयार करण्याकरिता सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. हा अहवाल आल्यानंतरच राज्यात अ‍ॅपधारित कॅब सेवा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे महामंडळाचे अध्यक्ष आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सांगितले. कदंब चालकांकडून सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड महामंडळ करीत नाही. वरचेवर अपघात घडविणाºया चालकांना दंड म्हणून पगारवाढ रोखली जाते, असे आल्मेदा यांनी एका प्रश्नावर सांगितले. 

Web Title: 900 drivers of 'Kadamb' will get training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.