पालिकांसाठी ७२.५३ टक्के

By admin | Published: October 26, 2015 02:58 AM2015-10-26T02:58:50+5:302015-10-26T02:59:36+5:30

पणजी : राज्यातील ११ पालिकांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत ७२.५३ टक्के मतदान झाले. १५९ प्रभागांमधून ६८५ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले. २ लाख ३७ हजार १८३

72.53 percent for the municipal corporation | पालिकांसाठी ७२.५३ टक्के

पालिकांसाठी ७२.५३ टक्के

Next

पणजी : राज्यातील ११ पालिकांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत ७२.५३ टक्के मतदान झाले. १५९ प्रभागांमधून ६८५ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले. २ लाख ३७ हजार १८३ मतदारांपैकी १ लाख ७२ हजार २0 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मडगाव येथे आमदार दिगंबर कामत यांच्या कार्यालयावर अज्ञात युवकांनी दगडफेक केली. पाजीफोंड येथे धक्काबुक्की झाली. वास्कोत सहाजणांना ताब्यात घेतले. या घटना वगळता अन्यत्र मतदान शांततेत पार पडले. मतमोजणी उद्या मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल.
१ लाख १९ हजार ३२४ पुरुष मतदारांपैकी ८३,६७९ जणांनी मतदान केले तर १ लाख १७ हजार ८५९ महिला मतदारांपैकी ८८,३४१ जणींनी मतदान केले. सर्वत्र मतदान शांततेत पार पडल्याचे तसेच कोणत्याही अनुचित घटनेची तक्रार आयोगाकडे आलेली नसल्याचे आयोगाचे सचिव व्ही. पी. डांगी यांनी स्पष्ट केले. (पान १० वर)

Web Title: 72.53 percent for the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.