गोव्यात सुरू करणार ७२ नवीन पेट्रोलपंप, डीलरशीपसाठी मागविले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 07:04 PM2018-11-25T19:04:34+5:302018-11-25T19:05:43+5:30

इंडियन आॅयल कॉर्पोरेशन लिमिटेड राज्यात नवीन ७२ नवीन पेट्रोलपंप सुरू करणार असून त्यासाठी इच्छुकांकडून कॉर्परेशनने अर्ज मागविले आहेत.

72 new petrol pump launches in Goa, applications invited for dealership | गोव्यात सुरू करणार ७२ नवीन पेट्रोलपंप, डीलरशीपसाठी मागविले अर्ज

गोव्यात सुरू करणार ७२ नवीन पेट्रोलपंप, डीलरशीपसाठी मागविले अर्ज

Next
ठळक मुद्देइंडियन आॅयल कॉर्पोरेशन लिमिटेड राज्यात नवीन ७२ नवीन पेट्रोलपंप सुरू करणार सध्या राज्यात उपलब्ध असलेले  पेट्रोलपंप हे लोकांची मागणी पूर्ण करण्यास अपुरे पडत आहेत. किमान  १७७  नवीन पेट्रोलपंपची गरज आहे

पणजी  - इंडियन आॅयल कॉर्पोरेशन लिमिटेड राज्यात नवीन ७२ नवीन पेट्रोलपंप सुरू करणार असून त्यासाठी इच्छुकांकडून कॉर्परेशनने अर्ज मागविले आहेत. इतक्या प्रमाणात अधिक पेट्रोलपंपची सध्या गोव्यात गरज असल्याचेही कॉर्पोरेशनने म्हटले आहे. 

या विषयी माहिती देताना कॉर्पोरेश्नचे राज्यस्तरीय समन्वयक नीरज राठोड यांनी सांगितले की, महामंडळाकडून राज्यातत सर्वत्र सर्व्हेक्षण करून पेट्रोलच्या वाढत्या मागणीची आणि व उपलब्ध पुरवठ्याचा अभ्यास केला.  सध्या राज्यात उपलब्ध असलेले  पेट्रोलपंप हे लोकांची मागणी पूर्ण करण्यास अपुरे पडत आहेत. किमान  १७७  नवीन पेट्रोलपंपची गरज आहे.  हे पेट्रोलपंप महामार्गावर तसेच राज्यांतील हमरस्त्यांजवळही हवे आहेत. पेट्रोल व डिजलची मागणी वढत आहे. देशाची पेट्रोलची मागणी ही सरासरी ४ टक्क्यांनी वाढत आहे तर गोव्याची मागणी ही ८ टक्क्यांनी म्हणजे दुप्पट प्रमाणात वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा हे जागतीक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असल्यामुळे तसेच इतर बाबतीतही गोव्याची प्रगती झाली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोलची मागणी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. कॉर्परेशनच्या सर्वोक्षणानुसार सर्व १७७ ठिकाणी पेट्रोलपंप सुरू केल्यास ते फायद्यात चालू शकतात, परंतु तूर्त ७२ पेट्रोलपंपच्या डिलरशीपसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 

नवीन पेट्रोलपंपसाठी इच्छुकांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज  करावे लागतील. जमीनीची उपलब्धता हा सर्वात महतत्वाचा निकष आहे. एकूण जागेची आवश्यकता व इतर आवश्यक पत्रांची माहिती कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. अर्जची प्रक्रियाही अत्यंत सोपी व सुटसुटीत करण्यात आली आहे. भांडवल व जागा या विषयी माहिती देण्यापूर्वीही अर्ज करण्याची सवलत देण्यात आली आहे. इतर माहिती नंतर देण्याची मुभा आहे. तसेच जास्तीत जास्त वय हे ५५ वर्षांवरून वाढवून ६० वर्षे करण्यात आले आहे.  असे राठोड यांनी सांगितले.  या पत्रकार परिषदेला इंडियन आॅईलचे ज्येष्ठ व्यवस्थापक सुरेश धुरी, विभागीय व्यवस्थापक जी मंजुनाथ आणि क्षेत्रीय व्यवस्थापक दिनेश ढोकने उपस्थित होते.

Web Title: 72 new petrol pump launches in Goa, applications invited for dealership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.