दाबोळी विमानतळावर प्रवाशाकडून ७ लाख ६४ हजारांची विदेशी चलने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 07:29 PM2019-02-16T19:29:20+5:302019-02-16T19:29:32+5:30

गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून बेकायदेशीररित्या शारजा देशात ७ लाख ६४ हजार रुपयांची विदेशी चलने घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका प्रवाशाला शनिवारी पहाटे कस्टम विभागाने ताब्यात घेऊन नंतर ही चलने जप्त केली.

7 lakh 64 thousand foreign currency seized from Daboli airport | दाबोळी विमानतळावर प्रवाशाकडून ७ लाख ६४ हजारांची विदेशी चलने जप्त

दाबोळी विमानतळावर प्रवाशाकडून ७ लाख ६४ हजारांची विदेशी चलने जप्त

googlenewsNext

वास्को: गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून बेकायदेशीररित्या शारजा देशात ७ लाख ६४ हजार रुपयांची विदेशी चलने घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका प्रवाशाला शनिवारी पहाटे कस्टम विभागाने ताब्यात घेऊन नंतर ही चलने जप्त केली. हा प्रवासी पहाटे ‘एअर अरेबिया’ विमानातून शारजाला जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र त्याच्या हावभावावरून कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्याच्या सामानाची तपासणी केली असता बॅगेत लपवून ठेवलेल्या एका पाकीटातून विविध विदेश चलने आढळल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली.

दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे सदर कारवाई करण्यात आली. ‘एअर अरेबिया’ चे जी ९- ४९३ हे विमान प्रवाशांना घेऊन दाबोळी विमानतळावरून शारजाला जाण्यापूर्वी येथे प्रवाशांची तपासणी करण्यात येत होती. तपासणीच्या वेळी एका प्रवाशावर कस्टम विभागाच्या अधिका-यांना संशय आल्याने त्यांनी त्वरित त्याच्या सामानाची कसून तपासणी केली. यावेळी त्याच्या एका बॅगेत त्यांने पाकिटात विविध विदेशी चलने लपवून ठेवल्याचे आढळून आले. बेकायदेशीर रित्या हा प्रवाशी सदर विदेशी चलने शारजा येथे नेत असल्याचे कस्टम अधिका-यांना तपासणीच्या वेळी स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी ह्या प्रकरणात कारवाई करून कस्टम कायद्याखाली सदर विदेशी चलने जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या ह्या विदेशी चलनांची भारतीय किंमत ७ लाख ६४ हजार रुपये असल्याची माहिती अधिका-यांनी दिली. दाबोळी विमानतळावरील कस्टम कमिश्नर आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

गेल्या दहा महिन्यात दाबोळी विमानतळावर ७५ लाख १४ हजार रुपयांची विदेशी चलने करण्यात आली जप्त

दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिका-यांनी एप्रिल २०१८ ते आता पर्यंत विविध कारवाया करून येथे आलेल्या विविध प्रवाशांकडून बेकायदेशीररित्या नेण्याचा प्रयत्न करत असलेले ७५ लाख १४ हजार रुपयांच्या विदेशी चलने जप्त केल्या आहेत. ३१ मार्च २०१९ ला हे आर्थिक वर्ष संपणार असून तो पर्यंत दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकारी आणखीन केवढ्या कारवाया करून बेकायदेशीररित्या माल हाताळणी करणा-यांना पकडणार हे येणा-या काळात स्पष्ट होणार आहे.

Web Title: 7 lakh 64 thousand foreign currency seized from Daboli airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा