गोव्यात पहिल्या आठ महिन्यातच 1.20 कोटींचे अंमलीपदार्थ जप्त, ड्रग पेडलर्सवर नजर ठेवण्यासाठी आता पोलीस श्र्वानांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 03:06 PM2017-10-24T15:06:08+5:302017-10-24T15:06:24+5:30

 गोव्यातील पर्यटन मोसम सुरु होऊन एक महिनाही झाला नाही अशा परिस्थितीत मागच्या वर्षीच्या तुलनेत गोव्यात यंदा अंमली पदार्थाच्या प्रकरणात भरमसाठ वाढ झाली आहे.

1.20 crores of ammunition seized in Goa in the first eight months, using Police Shares to keep track of drug payers | गोव्यात पहिल्या आठ महिन्यातच 1.20 कोटींचे अंमलीपदार्थ जप्त, ड्रग पेडलर्सवर नजर ठेवण्यासाठी आता पोलीस श्र्वानांचा वापर

गोव्यात पहिल्या आठ महिन्यातच 1.20 कोटींचे अंमलीपदार्थ जप्त, ड्रग पेडलर्सवर नजर ठेवण्यासाठी आता पोलीस श्र्वानांचा वापर

Next

मडगाव-  गोव्यातील पर्यटन मोसम सुरु होऊन एक महिनाही झाला नाही अशा परिस्थितीत मागच्या वर्षीच्या तुलनेत गोव्यात यंदा अंमली पदार्थाच्या प्रकरणात भरमसाठ वाढ झाली आहे. गोव्यात पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच अंमली पदार्थाचाही वावर वाढला आहे त्यामुळे आता असे ड्रग्स पकडण्यासाठी अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभाग (एएनसी)ने आता पोलीस श्र्वानांचा प्रभावी उपयोग करण्याचे ठरविले आहे.

2016 साली संपूर्ण बारा महिन्यात पोलिसांनी 1.01 कोटींचे अंमलीपदार्थ जप्त केले होते. यंदा पहिल्या आठ महिन्यांतच हे प्रमाण 1.20 कोटींवर पोचले आहे. मागच्या संपूर्ण वर्षात एएनसीने ड्रग्सची 60 प्रकरणो नोंद केली होती व त्यात 69 जणांना अटक केली होती. यंदा पहिल्या आठ महिन्यांतच या प्रकरणांची संख्या 79 वर पोचली असून अटक होणाऱ्यांची संख्या 84 वर पोचली आहे. येऊ घातलेल्या चार महिन्यात पर्यटन मोसम तेजीत येणार असल्याने या संख्येत आणखी बरीच वाढ होण्याची शक्यता आहे.

एएनसीचे अधिक्षक उमेश गावकर यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, गोव्यात परप्रांतातून अंमलीपदार्थ येत असल्याचे उघड झाले आहे. असे पदार्थ पकडण्यासाठी आता श्र्वानांचा प्रभावी उपयोग करण्याचे ठरविले आहे. अंमली पदार्थाना तीव्र वास येत असतो आणि हा वास श्र्वानांच्या नाकातून सुटत नाही. कित्येकवेळा गोव्यात येणारे अंमलीपदार्थ विदेशांतून येत असतात. पर्यटक म्हणून येणारे ड्रग डिलर्स आपल्या बॅगेत हे पदार्थ लपवून आणतात. प्रत्येक प्रवाशाची बॅग उघडून पहाणो शक्य नसते. अशावेळी लपवून आणलेले अंमलीपदार्थ श्र्वानांच्या तिक्ष्ण नाकांतून सुटू शकत नाहीत.

सध्या एएनसीकडे अंमलीपदार्थ पकडणारे एक श्र्वान आहे. आणखी एक श्र्वान आणण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत असे गावकर यांनी सांगितले. सध्या एएनसीच्या या विभागात एक पोलीस निरीक्षक, चार उपनिरीक्षक, दोन हवालदार, 12 शिपाई व एक महिला शिपाई एवढा कर्मचारी आहे.

पोलीस दफ्तरातून उपलब्ध झालेल्या माहितीप्रमाणो, यंदा ज्या 84 संशयितांना अंमलीपदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 63 भारतीय असून 21 विदेशी आहेत. मागच्यावर्षी 55 भारतीयांना तर 27 विदेशी नागरिकांना अशा प्रकारच्या गुन्हय़ात अटक करण्यात आली होती. यावर्षी एएनसीने एकूण 41.633 किलो अंमलीपदार्थ जप्त केला असून त्यात सर्वात मोठा साठा गांजाचा असून एकूण 37.511 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामागोमाग चरस, कोकेन, एमडीएमए, एलएसडी, हेरॉईन, अॅक्टसी व एम्फेटेमाईन या अंमली पदार्थाचा समावेश आहे. 2015 साली एएनसीने पूर्ण वर्षात अशी 61 प्रकरणो नोंद केली होती व त्यात 10.59 कोटींचा अंमलीपदार्थ जप्त केला होता. त्यावेळी 71 जणांना अटक करण्यात आली होती. त्यात 42 भारतीय तर 29 विदेशी नागरिकांचा समावेश होता.
 

Web Title: 1.20 crores of ammunition seized in Goa in the first eight months, using Police Shares to keep track of drug payers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.