गोव्यात 1.2 लाख लोक बेरोजगार, कामगारमंत्र्यांकडून विधानसभेत माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 07:41 PM2017-12-17T19:41:06+5:302017-12-17T19:41:16+5:30

पणजी: सरकारी दाव्यानुसार गोव्यात 1.2क् लाख लोक बेरोजगार असल्याची नोंद आहे. विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना कामगारमंत्री रोहन खंवटे यांनी ही माहिती विधानसभेत दिली. 

1.2 lakh people unemployed in Goa, information from legislators in the Legislative Assembly | गोव्यात 1.2 लाख लोक बेरोजगार, कामगारमंत्र्यांकडून विधानसभेत माहिती 

गोव्यात 1.2 लाख लोक बेरोजगार, कामगारमंत्र्यांकडून विधानसभेत माहिती 

Next

पणजी: सरकारी दाव्यानुसार गोव्यात 1.2क् लाख लोक बेरोजगार असल्याची नोंद आहे. विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना कामगारमंत्री रोहन खंवटे यांनी ही माहिती विधानसभेत दिली. 
बेरोजगारीची समस्या ही इतर राज्यांप्रमाणो गोव्यालाही भेडसावत आहे. बेरोजगारांना रोजगार भत्ता देण्यासंबंधी भाजपने मागील निवडणुकीपूर्वी आश्वासने देण्यात आली होती. त्या अनुशंगाने कवळेकर यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडताना एकूण गोव्यातील बेरोजगारांची संख्या विचारली होती. मंत्री खवंटे यांनी दिलेल्या लेखी उत्तरानुसार राज्यात एकूण 1.2क् लाख लोकांना रोजगार नाही. त्यात 63818 पुरूष तर 57113 महिला आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे 76470 हे उत्तर गोव्यात तर दक्षीण गोव्यात 44461 लोकांचा समावेश आहे. 
सरकारने मिळविलेली माहिती ही राज्यातील दोन्ही रोजगार विनिमय केंद्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे. या केंद्रातून मिळालेली माहिती ही तंतोतंत खरी असण्याची शक्यता फार कमीच असते. कारण बेरोजगारांची संख्या ठरविताना केंद्राकडून जे निकष वापरले जातात त्यातून राज्यातील वस्तुनिष्ट स्थिती स्पष्ट होणो कठीणच असते.  एखाद्या युवकाला विनिमय केंद्रातून नोकरीसाठीच्या मुलाखतीसाठी कॉल लेटर पाठविल्यानंतर त्या युवकाला ती नोकरी मिळाली तर रोजगार केंद्रातील प्रतीक्षा यादीतून त्याचे नाव वगळले जाते. तसेच केंद्रात ज्या युवक युवतींनी नावे नोंदविली असतात त्यांना ठरावीक मुदतीनंतर त्यांचे नूतनीकरण करावे लागते. नूतनीकरण न केल्यास त्यांना रोजगार मिळाला असे गृहीत धरून  नूतनीकरण न केलेल्यांची नावे गाळली जातात. जे कुणी उमेदवार खाजगी कंपन्यात किंवा इतरत्र नोक:या करतात त्यांची नावे ही रोजगार केंद्रातील प्रतिक्षा यादीतून वगळली जातातच असेही नाही. त्यामुळे केंद्राकडे असलेली माहिती ही 1क्क् टक्के वस्तुनिष्ठ असण्याची शक्यता कमीच असते. जे युवक युवती रोजगाराविना आहेत त्यांना रोजगार भत्ता वगैरे दिला जातो का असा प्रश्नही कवळेकर यांनी केला होता. या प्रश्नाला मंत्र्याकडून ‘नाही’ असे उत्तर देण्यात आले आहे.

Web Title: 1.2 lakh people unemployed in Goa, information from legislators in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.