पावसाळ्यात पूर येऊ नये म्हणून १ कोटी ७० लाखाच्या मान्सूनपूर्व कामांचा शुभारंभ

By पंकज शेट्ये | Published: March 13, 2024 08:18 PM2024-03-13T20:18:41+5:302024-03-13T20:18:56+5:30

दोन्ही तालावांच्या स्वच्छता कामासाठी १ कोटी ७० लाख खर्च होणार असल्याची माहिती

1 crore 70 lakh pre-monsoon works to prevent floods during monsoon | पावसाळ्यात पूर येऊ नये म्हणून १ कोटी ७० लाखाच्या मान्सूनपूर्व कामांचा शुभारंभ

पावसाळ्यात पूर येऊ नये म्हणून १ कोटी ७० लाखाच्या मान्सूनपूर्व कामांचा शुभारंभ

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: पावसाळ्यात वास्को मतदारसंघात पूर - बुडती येऊ नये यासाठी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी काही महीने अघोधरच मान्सूनपूर्व कामांचा शुभारंभ केला. म्हायमोळे तालावातील आणि तानिया हॉटेल जवळील तालावातील जलपर्णी काढून आणि गाळ उपसून तालावाच्या स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ आमदार साळकर यांनी बुधवारी (दि.१३) केला. त्या दोन्ही तालावांच्या स्वच्छता कामासाठी १ कोटी ७० लाख खर्च होणार असल्याची माहीती त्यांनी दिली.

बुधवारी आमदार कृष्णा साळकर यांनी मान्सूनपूर्व कामाचा शुभारंभ केल्यानंतर जलस्तोत्र विभागातर्फे दोन्ही तालावातील जलपर्णी काढून आणि गाळ उपसून तालावाच्या स्वच्छतेच्या कामाची सुरवात झाली. त्यावेळी आमदार साळकर यांच्याबरोबर मुरगावचे नगराध्यक्ष गीरीश बोरकर, नगरसेवक दिपक नाईक, नगरसेवक अमेय चोपडेकर, नगरसेविका शमी साळकर, प्रशांत नार्वेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पावसाळ्यात वास्कोत पूर - बुडती अशा समस्या निर्माण न व्हाव्य यासाठी काही महीने अघोधरच मान्सूनपूर्व कामांची सुरवात केल्याचे साळकर यांनी सांगितले.

गेल्यावर्षी वेळेत मान्सूनपूर्व कामे झाल्याने वास्कोत पूर - बुडती सारख्या समस्या निर्माण झाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी तानिया हॉटेल जवळील तालावातील जलपर्णी काढून आणि गाळ उपसून तालावाची स्वच्छता करीत पावसाच्या पाण्याला जाण्याचा मार्ग करून दिला जायचा. यंदा त्या तालावाबरोबरच म्हायमोळे तालावाच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले असून त्यामुळे पावसाळ्यात वास्कोत लोकांना मूळीच बुडती - पूर अशा समस्येचा त्रास होणार नसल्याचे साळकर म्हणाले. म्हायमोळे तालावाच्या स्वच्छतेसाठी ७० लाख तर दुसऱ्या तालावाच्या स्वच्छतेसाठी १ कोटी खर्च होणार असल्याची माहीती त्यांनी दिली. जलपर्णी काढून आणि गाळ उपसून तालावाची स्वच्छता करण्याचे हातात घेतलेले काम एप्रिल अखेरीस पूर्ण होणार असल्याची माहीती साळकर यांनी दिली.

Web Title: 1 crore 70 lakh pre-monsoon works to prevent floods during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा