सर्व निर्देशांकावर लक्ष ठेवून काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 11:40 PM2018-07-14T23:40:37+5:302018-07-14T23:44:00+5:30

आकांक्षित जिल्हा कार्यक्रम हा निती आयोगाने दिलेला विकासाचा उत्तम असा पथदर्शी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील सर्व निर्देशांकावर अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करुन काम केले तर गडचिरोली जिल्ह्याचा विकास निश्चितपणे होईल असे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांनी शनिवारी येथे केले.

Work closely with all the indices | सर्व निर्देशांकावर लक्ष ठेवून काम करा

सर्व निर्देशांकावर लक्ष ठेवून काम करा

Next
ठळक मुद्देमुख्य सचिवांच्या अधिकाऱ्यांना सूचना : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आकांक्षित जिल्हा कार्यक्रम हा निती आयोगाने दिलेला विकासाचा उत्तम असा पथदर्शी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील सर्व निर्देशांकावर अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करुन काम केले तर गडचिरोली जिल्ह्याचा विकास निश्चितपणे होईल असे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांनी शनिवारी येथे केले.
गडचिरोली जिल्हा दौºयावर आलेल्या मुख्य सचिवांनी शनिवारी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाची आतापर्यंतची आतापर्यंतच्या प्रगतीसंदर्भातील आढावा बैठक घेतली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात जे निर्देशांक ठरवून दिले आहे, त्यांचा अंमलबजावणी करणाºया अधिकाºयांनी खोलात जाऊन अभ्यास करावा. सर्व निर्देशांक पूर्ण होईल व आपण ठरविलेली उद्दीष्टे गाठता येतील. यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे. प्रत्यक्ष गावात पोहोचून योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश मुख्य सचिव जैन दिले.
यावेळी मुख्य सचिवांनी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत असलेल्या ४९ निर्देशांकाची पूर्ण माहिती अंमलबजावणी करणाऱ्या विभागांकडून जाणून घेतली. याचे दरमहा गुणांकन कशा पध्दतीने होते, हे जाणून घेतल्यानंतर त्यात आघाडीवर असणाºया जिल्ह्यांशी तुलना होणार असल्याने त्यांनी ठरविलेली उद्दीष्टे जाणून घेतली पाहिजेत, निर्देशांकानुसार काम व्हायला पाहिजे असे मुख्य सचिवांनी सांगितले.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत माहितीचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी यांनी आकांक्षित जिल्ह्यासंदर्भात आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात योजनांच्या माध्यमातून केलेल्या कार्याची माहिती दिली.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सुक्ष्म जलसिंचनातून रबीचे क्षेत्र वाढवा -अनुपकुमार
जिल्ह्यात या निर्देशांकात काम करताना आपण ठरवलेल्या उद्दीष्टांबाबत विविध विभागांच्या अधिकाºयांनी माहिती दिली. जिल्ह्यात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे वनऔषधीची लागवड करुन तसेच फलोत्पादनातून उपजीविका साधनांची वृध्दी करण्यात याव्या, अशा सूचना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात रबीचे क्षेत्र कमी आहे ते वाढवण्याची गरज आहे. जलयुक्त शिवार, सिंचन विहीरी आणि मामा तलाव यांची मोठी कामे झाल्याने जिल्ह्यात जलसाठा वाढला आहे. त्याचा वापर करुन सुक्ष्म जलसिंचनाच्या माध्यमातून रबीचे क्षेत्र वाढवण्याचे निर्देश अनुपकुमार यांनी दिले. तसेच कीड व रोगांचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतकºयांना प्रमाणित बियाणांचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम कृषी विभागाने करावे, असेही निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

Web Title: Work closely with all the indices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.