एक हजार शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:31 PM2019-05-30T23:31:19+5:302019-05-30T23:31:54+5:30

कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकºयाला ३१ मार्च २०१८ पर्यंत उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही सुरू झाली आहे. १ हजार १८४ शेतकºयांची वीज जोडणीसाठी मागणी आहे.

Waiting for power connections for one thousand farmers | एक हजार शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा

एक हजार शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देकेवळ १७१ शेतकऱ्यांना लाभ : डेडलाईन संपूनही उच्च दाबाचा पुरवठा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकºयाला ३१ मार्च २०१८ पर्यंत उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही सुरू झाली आहे. १ हजार १८४ शेतकऱ्यांची वीज जोडणीसाठी मागणी आहे. परंतू वर्षभरात केवळ १७१ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे.
आजपर्यंत कृषीपंपांना लघुदाब वाहिनीवरून वीज पुरवठा केला जात होता. मात्र या लाईनवरून वीज पुरवठा गेल्याने व्होल्टेजची गंभीर समस्या निर्माण होत होती. कमी व्होल्टेजमुळे कृषीपंप काम करीत नाही. याबाबत शेतकºयांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे शासनाने मागील वर्षी कृषीपंपांना उच्चदाब वाहिणीद्वारेच वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार ३१ मार्च २०१८ पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज वीज जोडणीसाठी प्रलंबित होते. अशा शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वाहिणीद्वारेच पुरवठा केला जाणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या शेतापर्यंत उच्चदाब वाहिणी नेऊन त्याच्या शेतात ट्रान्सफार्मर बसविला जाणार आहे. १०० फुटाच्या आत अंतरावर असलेल्या दुसºया शेतकऱ्याने मागणी केल्यास त्याला संबंधित डीपीवरून वीज पुरवठा दिला जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत एका ट्रान्सफार्मरवरून दोन पेक्षा अधिक पंपांना वीज पुरवठा केला जाणार नाही. त्यासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसविले जाणार आहे.
राज्य शासनाने घोषणा केल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ३५५ कृषीपंप वीज जोडणीची मागणी आहे. त्यापैकी १७१ कृषीपंप लावण्यात आले आहेत. त्यातील २१ कृषीपंप सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १५० ट्रान्सफार्मर लावून १५१ वीज जोडण्या सुरू झाल्या आहेत.

एका वीज जोडणीसाठी लाखोंचा खर्च
उच्चदाब वाहिनीने कृषीपंपाला वीज पुरवठा करताना शासनाला लाखो रुपयांचा खर्च येतो. ट्रान्सफार्मरची किंमत दोन ते अडीच लाख रुपये एवढी आहे. सोबतच उच्चदाब वाहिनीसुध्दा आणावी लागते. एकंदरीतच एका जोडणीचा खर्च तीन ते चार लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे. शेतकऱ्यांसाठी शासन एवढा खर्च करीत आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यातून उत्पादन घ्यावे, अशी अपेक्षा आहे. मात्र काही शेतकरी केवळ वीज जोडणीचा लाभ घेईपर्यंत वीज जोडणीसाठी घाई करतात. त्यानंतर मात्र त्यामध्ये कोणतेच उत्पादन काढत नाही, परिणामी शासनाचा लाखोंचा खर्च पाण्यात जातो असे महावितरणचे अधिकारी सांगतात.

उच्चदाब वीज जोडणीमुळे कृषीपंपांची व्होल्टेजची समस्या कायमची संपणार आहे. शासनाने निर्णय घेतल्यापासून जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. येत्या सहा महिन्यात उर्वरित सर्व शेतकºयांना उच्चदाब वीज जोडणीचा लाभ देण्यासाठी महावितरण प्रयत्नरत आहे.
- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण गडचिरोली

Web Title: Waiting for power connections for one thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.