वाहन कालव्यात कोसळले; तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 10:18 PM2019-04-18T22:18:21+5:302019-04-18T22:18:45+5:30

भिवापूर जवळील कन्नमवार जलाशयाच्या नहरात बोलोरे पीकअप वाहन कोसळून ३ जण ठार तर १३ गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

The vehicle collapsed in the canal; Three killed | वाहन कालव्यात कोसळले; तीन ठार

वाहन कालव्यात कोसळले; तीन ठार

googlenewsNext
ठळक मुद्दे१३ वºहाडी गंभीर जखमी : कन्नमवार जलाशयाच्या १५ फूट खोल कालव्यात घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : भिवापूर जवळील कन्नमवार जलाशयाच्या नहरात बोलोरे पीकअप वाहन कोसळून ३ जण ठार तर १३ गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
मुकुंदा दिवाकर वासेकर (४५) रा. सिमतळा, तुळशीराम शिवा बुरांडे (५५) रा. इटोली, सुषमा बुरांडे (३५) रा. इटोली जिल्हा चंद्रपूर अशी मृतकांची नावे आहेत. गंभीर जखमींमध्ये पार्वता देवतळे (७०), श्यामसुंदर देवतळे (४०), सावित्रीबाई वासेकर (६०), बापुजी देवतळे (७०) सर्व रा. इटोली, भागवती दुधबळे (६५) रा. मानोरा, राजू पिंपरे (४०) रा. बल्हारशहा हे गंभीर जखमी आहेत. यापैकी काहींना गडचिरोली तर काहींना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. ताराबाई देवतळे (६५), संगीता देवतळे (४०), रामदेव पिपरे (५०), बापुजी देवतळे (७०), विमल चलाख (४५) सर्व रा. इटोली, माधुरी वासेकर (३०) रा. सिमतळा, आनंदाबाई वासेकर (७०) रा. सुशी यांच्यावर ग्रामीण रूग्णालय चामोर्शी येथे उपचार सुरू आहेत.
या वाहनात जवळपास २५ वºहाडी होते. १५ फुट खोल असलेल्या नहरात भरधाव वेगाने असलेले वाहने कोसळले व ते उलटलेसुद्धा यामध्ये बरेचशे वºहाडी वाहनाच्या बाहेर फेकल्या गेले. नहरात असलेल्या दगडांना आदळून काही जणांच्या कंबर, डोके, कपाळाला मार लागला आहे.
बल्हारशहा तालुक्यातील इटोली येथील उमाजी देवतळे यांच्या मुलीचा विवाह चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथील देवराव वासेकर यांच्या मुलासोबत गुरूवारी पार पडला. लग्न ओटोपून वरात एमएच ३४ बी जी ०५८५ क्रमांकाच्या महेंद्रा बोलोरे पीकअप वाहनाने चामोर्शीकडून इटोलीकडे जाण्यासाठी निघाली असता, भिवापूर गावाजवळील दिना नहरात वाहन उलटले. भिवापूर गावाजवळ नहरावर पूल आहे. या पुलाजवळ वळण आहे. भरधाव वेगाने असलेल्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे पुलावरून वाहन न जाता सरळ नाल्यात जाऊन कोसळले व उलटले.
मालवाहू वाहनाने प्रवासी वाहतूक वाढली
लग्नसराईच्या कालावधीत वरात नेण्यासाठी प्रामुख्याने मालवाहू वाहनांचा वापर केला जातो. मालवाहू वाहने प्रवाशी वाहतुकीसाठी वापरणे अवैध असले तरी या वाहनांचा वापर होतो. उभे राहून प्रवाशी प्रवास करतात. वरून कोणतेही संरक्षण राहत नसल्याने वाहन उलटल्यावर प्रवाशी मृत्यूमुखी पडतात. विशेष म्हणजे, बुधवारी कोडसेपल्लीत दोन वाहनांची धडक होऊन चार जणांचा बळी गेला.

Web Title: The vehicle collapsed in the canal; Three killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.