छत्तीसगड सीमेवर दोन जहाल महिला माओवाद्यांना अटक; सी- ६० पथकाची कारवाई 

By संजय तिपाले | Published: April 7, 2024 07:46 PM2024-04-07T19:46:56+5:302024-04-07T19:47:08+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचा माओवाद्यांचा डाव उधळून लावण्यात पोलिस यशस्वी झाले.

Two Jahal women Maoists arrested on Chhattisgarh border Operation of C-60 Squad | छत्तीसगड सीमेवर दोन जहाल महिला माओवाद्यांना अटक; सी- ६० पथकाची कारवाई 

छत्तीसगड सीमेवर दोन जहाल महिला माओवाद्यांना अटक; सी- ६० पथकाची कारवाई 

गडचिरोली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचा माओवाद्यांचा डाव उधळून लावण्यात पोलिस यशस्वी झाले. महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील पिपली बुर्गी पोलिस ठाणे हद्दीतील जवेली जंगलात दोन जहाल महिला माओवाद्यांना सी- ६० पथकाने ७ एप्रिलला ताब्यात घेतले, यासोबतच गिलनगुडा जंगल परिसरातून हस्तकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या तिघांवरही महाराष्ट्र सरकारने तब्बल साडेपाच लाखांचे बक्षीस ठेवले होते.

काजल ऊर्फ सिंधू गावडे (वय २८ , रा. कचलेर ता. एटापल्ली) व गीता ऊर्फ सुकली कोरचा (वय ३१ , रा. रामनटोला, ता. एटापल्ली ) या दोन जहाल महिला माओवाद्यांना
गडचिरोली- छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्याच्या सीमेवर पिपली बुर्गी हद्दीतील मौजा जवेली जंगल परिसरातून अटक केली.

पोयारकोटी चकमकीत सहभाग
२०२० मध्ये कोपर्शी – पोयारकोटी जंगल परिसरात पोलिस - माओवाद्यांत चकमक झाली होती. त्यात पोलिस दलातील एक अधिकारी व एक जवान शहीद झाले होते. या चकमकीत काजल गावडे व गीता कोरचा या दोघींचा प्रत्यक्ष सहभाग होता, असे चौकशीत निष्पन्न झाले.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल ,अपर अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता , एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपीएफचे ई-१९१ बटा. चे असिस्टंट कमांडेन्ट मोहित कुमार, सीआरपीएफ जी-१९२ बटा. चे असिस्टंट कमांडेन्ट दीपक दास, पिपली बुर्गीचे प्रभारी अधिकारी वैभव रुपवते, गट्टा (जां.) चे प्रभारी अधिकारी चेतन परदेशी तसेच विशेष अभियान पथकाच्या जवानांनी ही कारवाई केली.

काजल १४ व्या वर्षी माओवादी चळवळीत काजल ऊर्फ सिंधू गावडे ही २०१२ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षीच माओवादी चळवळीत दाखल झाली. प्लाटुन क्र. ५५ मध्ये सदस्य या पदावर भरती होऊन सन २०१९ पर्यंत कार्यरत होती. २०१९ मध्ये कंपनी क्र. ४ मध्ये बदली होऊन सन २०२० पर्यंत सदस्य पदावर होती. त्यानंतर ती डिव्हीजनल कमिटीत सदस्य पदावर होती. तिचा सात चकमकींत सहभाग होता. कनेली व पुसेर साखरदेव जंगल परिसरात शस्त्रे जमिनीत पुरुन ठेवल्याचाही आरोपही तिच्यावर आहे.
 
गीतावर पाच गुन्हे
२०१८ मध्ये गीता कोरचा ही भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सप्टेंबर २०२० पर्यंत कार्यरत होती. सप्टेंबर २०२० मध्ये माड एरीया मध्ये बदली होऊन ती सदस्य पदावर आतापर्यंत कार्यरत होती. चकमकीच्या तीन गुन्ह्यांत तिचा सहभाग होता. एका पोलिस जवानाच्या व निरपराध नागरिकाच्या हत्येचाही तिच्यावर आरोप आहे. पिसा नरोटे पाच महिन्यांपासून देत होता गुंगारा नोव्हेंबर २०२३ मध्ये टिटोळा ते पामाजीगुडा जंगलातील टिटोळाच्या पोलिस पाटलाच्या हत्येत माओवाद्यांचा हस्तक पिसा पांडू नरोटे (रा. झारेवाडा ता. एटापल्ली ) याचा सहभाग होता. त्याला गिलनगुडा जंगलातून ताब्यात घेतले. २०१८ पासून तो माओवादी चळवळीत होता.

Web Title: Two Jahal women Maoists arrested on Chhattisgarh border Operation of C-60 Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.