गडचिरोलीतील व्यंकटापूर येथे आदिवासींनी प्रथमच साजरी केली दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 04:06 PM2017-10-20T16:06:29+5:302017-10-20T16:08:36+5:30

हेल्पिंग हँड्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व अनुगामी लोकराज्य महाअभियान यांच्या वतीने व उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशनच्या प्रांगणात अहेरी तालुक्यातील आदिवासी नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

Tribal people celebrate Diwali in Gadchiroli for the first time in Vyankatapure | गडचिरोलीतील व्यंकटापूर येथे आदिवासींनी प्रथमच साजरी केली दिवाळी

गडचिरोलीतील व्यंकटापूर येथे आदिवासींनी प्रथमच साजरी केली दिवाळी

Next
ठळक मुद्देहेल्पिंग हँड्सचा उपक्रमव्यंकटापूर उपपोलिस स्टेशनचेही सहकार्य

आॅनलाईन लोकमत
अहेरी-
हेल्पिंग हँड्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व अनुगामी लोकराज्य महाअभियान यांच्या वतीने व उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशनच्या प्रांगणात अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाºया अंबेझरा, लंकाचेन, कर्णेली, चिण्णा वट्रा, पेद्दा वट्रा, कोत्तागुडम, आवलमारी येथील आदिवासी नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी उप पोलीस स्टेशन व्यंकटापूरचे प्रभारी अधिकारी योगेश पाटील, प्रमुख अतिथी म्हणून अहेरी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा प्राजक्ता पेदापल्लीवार, पोलीस उपनिरीक्षक वाय.डी.पाटील, हेल्पिंग हँड्स संस्थेचे अध्यक्ष प्रतीक मुधोळकर व सरपंच, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी ४००-५०० महिला-पुरु ष व लहान मुलांना दिवाळीनिमित्य नवीन कपडे, दिवाळीचा फराळ, फटाके, ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या परिसरात गरिबांची दिवाळी साजरी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती देण्यात आली. पोलीस विभागातर्फेयावेळी सर्व उपस्थित नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली. आगळी वेगळी दिवाळी साजरी होण्याचा आनंद नागरिकांसह लहान मुलामुलींच्या चेहºयावर आनंद झळकत होता.

Web Title: Tribal people celebrate Diwali in Gadchiroli for the first time in Vyankatapure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.