तापमान वाढविणार उमेदवारांचे टेंशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 09:03 PM2018-05-08T21:03:49+5:302018-05-08T21:03:49+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक २८ मे ला जाहीर झाली आहे. मात्र मे महिन्यात विदर्भात तापमान चाळीस अंशाच्यावर राहत असल्याने भर उन्हात मतदार मतदानासाठी घराबाहेर पडणार का? मतदानाची टक्केवारी कमी झाल्यास त्याचा फटका बसू शकतो.

Tension of candidates who will increase the temperature | तापमान वाढविणार उमेदवारांचे टेंशन

तापमान वाढविणार उमेदवारांचे टेंशन

Next
ठळक मुद्देमतदानावर परिणामाची शक्यता : लोकसभा पोटनिवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक २८ मे ला जाहीर झाली आहे. मात्र मे महिन्यात विदर्भात तापमान चाळीस अंशाच्यावर राहत असल्याने भर उन्हात मतदार मतदानासाठी घराबाहेर पडणार का? मतदानाची टक्केवारी कमी झाल्यास त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे काहीही झाले तरी मतदानाची टक्केवारी कमी होवू नये, यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न असणार आहेत. मात्र निवडणुकीपूर्वी वाढत्या तापमानाने उमेदवारांचे टेशंन वाढविले आहे ऐवढे मात्र निश्चित.
निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर भर उन्हाळ्यात या दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील १४ लाखांवर मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. मतदारांमध्ये युवा आणि नव मतदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा भर युवा आणि नव मतदारांचे मन वळविण्याकडे असणार आहे. मागील लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीपासून निवडणुकीत सोशल मिडियाची भूमिका सुध्दा महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे सोशल मिडियावर विविध पोस्ट टाकून उमेदवारांच्या नावांची चाचपणी केली जात होती. सत्ताधारी पक्ष आमच्या पक्षांने मागील चार वर्षांत काय केले हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तर विरोधक सत्तारुढ सरकारने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केली नसल्याचे सांगत दोषारोप करीत आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वीच नांदी आहे. तर ज्या टशनमध्ये माजी खासदार नाना पटोले यांनी भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावरुन ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपासाठी तेवढीच प्रतिष्ठेची झाली आहे. यासाठीच या दोन्ही पक्षाने दिग्गज नेते उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार आहेत.
राष्टÑवादी काँग्रेसने व भाजपाने अद्यापही उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केलेली नाही. भाजपा उमदेवार बुधवारी नामाकंन अर्ज दाखल करणार आहे तर राष्टÑवादी काँग्रेसचा उमेदवार गुरूवारी नामाकंन अर्ज भरणार आहे. त्यामुळे गुरूवारीच उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर खºया अर्थाने निवडणुकीचा ज्वर वाढण्यास सुरूवात होईल. विशेष म्हणजे भर उन्हाळ्यात निवडणूक होत असल्याने मतदानाची टक्केवारी कमी होणार नाही याकडे सर्वांचे लक्ष असेल.
लढत दोनच पक्षात
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी नामाकंन दाखल केले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोनच पक्षाच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा होणार असल्याची माहिती आहे.
उमेदवारांच्या घोषणेवरुन संभ्रम
राष्टÑवादी काँग्रेस आणि भाजपाने अद्यापही उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली नाही. मात्र बुधवारी (दि.८) राष्ट्रवादीची उमेदवारी मधुकर कुकडे यांना तर भाजपातर्फे मा.आ.हेमंत पटले यांना उमेदवारी जाहीर झाल्याची जोरदार चर्चा होती. मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अद्यापही उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे उमेदवारांच्या घोषणेवर संभ्रम कायम आहे.
नामाकंन दाखल करताना शक्तीप्रदर्शन
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे उमेदवार बुधवारी भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नामाकंन अर्ज दाखल करणार आहे. यावेळी या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. नामाकंन अर्ज दाखल करताना दोन्ही पक्षांकडून शक्ती प्रदर्शन केले जाणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे संदेश मोबाईलवर पाठविले जात आहे.

Web Title: Tension of candidates who will increase the temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.