दिल्लीतील पर्यटनस्थळे बघून थक्क झाली तनिष्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:30 PM2019-06-27T22:30:29+5:302019-06-27T22:30:48+5:30

लोकमतच्या ‘संस्कारांचे मोती’ या उपक्रमांतर्गत हवाई सफरसाठी गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोलीच्या कारमेल हायस्कूलची आठव्या वर्गाची विद्यार्थिनी तनिष्का विवेकानंद चांदेकर हिची निवड झाली होती.

Tanishka was surprised to see the tourist attractions in Delhi | दिल्लीतील पर्यटनस्थळे बघून थक्क झाली तनिष्का

दिल्लीतील पर्यटनस्थळे बघून थक्क झाली तनिष्का

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमत संस्कारांचे मोती : नागपूर ते दिल्लीपर्यंतची हवाई सफर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकमतच्या ‘संस्कारांचे मोती’ या उपक्रमांतर्गत हवाई सफरसाठी गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोलीच्या कारमेल हायस्कूलची आठव्या वर्गाची विद्यार्थिनी तनिष्का विवेकानंद चांदेकर हिची निवड झाली होती. तनिष्काने महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांसोबत दिल्लीतील अनेक प्रेक्षणीय स्थळांना २६ जून रोजी भेट दिली. ही स्थळे बघून तनिष्का थक्क झाली. लोकमतच्या पुढाकाराने विमान प्रवासाचा आनंद लुटता आल्याने तिने लोकमतचे आभार मानले आहे. संस्काराचे मोती हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला असून विविध प्रकारचे सामान्य ज्ञान, अनेक बक्षीसे मिळण्यासोबतच दिल्लीच्या हवाई सफरची संधी मिळते. त्यामुळे यावर्षीही आपण यात सहभागी होणार असल्याचे तनिष्का म्हणाली.
हवाई सफर करून आलेल्या तनिष्काने सांगितले की, यापूर्वी मी विमानतळ बघितले होते. मात्र प्रत्यक्ष विमानाने प्रवास केला नव्हता. लोकमतच्या हवाई सफरअंतर्गत आपली निवड झाल्याचे कळताच आपल्याला खूप आनंद झाला. नागपूर ते दिल्लीपर्यंतच्या विमानातील प्रवासाची मजा काही औरच होती. दिल्ली येथील संसद भवन, इंडिया गेट, रेल्वे म्युझिअम, लाल किल्ला आदी स्थळांना भेटी दिल्या. या स्थळांची माहिती जाणून घेतली. आम्ही संसद भवनाजवळ असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या वाहनाने संसदेबाहेर जात होते. त्यावेळी वाहनातून त्यांनी या मुलांना हात दाखवून त्यांच्या भेटीचे स्वागत केले.
पंतप्रधान मोदी यांना मी दररोज टीव्हीवर बघते, मात्र त्यांना प्रत्यक्ष बघण्याचा योग लाभल्याने मी अतिशय आनंदी झाली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संजय धोत्रे यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा केली. लोकमतमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या इतर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधता आला. त्यांची संस्कृती, शैक्षणिक वातावरण याबाबतही चर्चा करता आली. सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेला प्रवास रात्री १० वाजता संपला. दिवसभरातील या प्रवासात घेतलेल्या मजेचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे, अशी प्रतिक्रिया तनिष्काने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Tanishka was surprised to see the tourist attractions in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.