एससी आरक्षणात वर्गवारी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:29 PM2017-12-12T23:29:36+5:302017-12-12T23:29:59+5:30

Sort the SC Resolve | एससी आरक्षणात वर्गवारी करा

एससी आरक्षणात वर्गवारी करा

googlenewsNext
ठळक मुद्देमादगी समाज संघटनेची मागणी : चंद्रपुरात राज्यव्यापी मोर्चा धडकणार

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : महाराष्ट्रात अनुसूचित जाती प्रवर्गात एकूण १५३ जाती मोडतात. यामध्ये ३५ क्रमांकावर मादगी या जातीचा समावेश आहे. एससी प्रवर्गाला १३.५ टक्के आरक्षण असले तरी स्पर्धेच्या युगात कमकुवत व मागास असलेल्या मादगी समाज प्रगतीपासून वंचित आहे. मादगी समाजाला प्रगत करण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षणात ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशी वर्गवारी करण्यात यावी, अशी मागणी मादगी समाज संघटनेच्या पदाधिकाºयांनी पत्रकार परिषदेत केली.
सदर मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनेच्या वतीने १५ डिसेंबर रोजी शुक्रवारला चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्त्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मंदाक्रिष्ण मादिगा व प्रदेशाध्यक्ष समय्या पसूला करणार आहेत.
यावेळी पदाधिकाºयांनी सांगितले की मादगी जातीचे लोक सोलापूर, पुणे, मुंबई, नांदेड व विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. मात्र हा जातीसमूह पूर्वाश्रमीच्या महार, चांभार व मांगाच्या तुलनेत प्रचंड मागास राहिला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या वर्गवारीची गरज आहे, असे पसुला यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला गोपाल रायपुरे, काशिनाथ देवगडे, देवाजी लाटकर, सुनील येमुलवार, मंदिप गोरडवार, नंदू कथेले, सरिता पोहरे, विद्या इप्पावार, पद्मा पसूला आदी उपस्थित होते.

Web Title: Sort the SC Resolve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.