शहीद परिवारांसोबत एसपींनी साजरी केली दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 11:51 PM2018-11-08T23:51:01+5:302018-11-08T23:52:24+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वीर मरण पत्कराव्या लागलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. यामुळे शहिदांच्या कुटुंबांचे दु:ख कमी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत झाली.

Shahid celebrates Diwali with SP families | शहीद परिवारांसोबत एसपींनी साजरी केली दिवाळी

शहीद परिवारांसोबत एसपींनी साजरी केली दिवाळी

googlenewsNext
ठळक मुद्देकुटुंबाचा आनंद झाला द्विगुणीत : जिल्हा पोलीस अधीक्षकांची अभिनव संकल्पना

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वीर मरण पत्कराव्या लागलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. यामुळे शहिदांच्या कुटुंबांचे दु:ख कमी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत झाली.
जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) डॉ.हरी बालाजी, उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) समिरसिंह साळवे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रदीप चौैगावकर व विशेष अभियान पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेश खांडवे यांनी शहीद परिवारांना भेट देऊन त्यांना फराळ, शैक्षणिक साहित्य, भेटवस्तू दिल्या. वरिष्ठ पोलीस अधिकारी एन दिवाळीच्या दिवशी घरी आल्याचे बघून शहीद परिवारातील सदस्यांचा आनंद द्विगुणीत झाला. भेटवस्तू दिल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी शहिदांच्या कुटुंबासोबत चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या. शहीद परिवाराला निर्माण होणाºया समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाºयांना दिले.
आपला परिवार आनंदात जगावा, यासाठी रक्ताचे पाणी करणारा कुटुंब प्रमुखच आनंदाच्या क्षणी हजर नसल्याने त्याची उणीव शहिदांच्या कुटुंबांना प्रत्येक सणाच्यावेळी जाणवते. मात्र हे दु:ख पचवून शहिदांचे कुटुंब सण साजरे करत होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या अभिनव संकल्पनेतून दिवाळीनिमित्त शहिदांच्या कुटुंबांना भेट देण्याची संकल्पना राबविण्यात आली. त्यानुसार भेटी देऊन समस्या जाणल्या. पोलीस अधीक्षकांच्या या अभिनव संकल्पनेचे कौतुक केले जात आहे.

पोलीस अधीक्षकांनी जाणल्या अडीअडचणी
कुटुंबाचा आधार असलेला व्यक्ती निघून गेल्यानंतर शहिदांच्या परिवारावर दु:खांचा डोंगर कोसळला आहे. या दु:खांचा सामना करीत शहिदांचे कुटुंब जीवन जगत आहेत. दैनंदिन समस्यांसोबत प्रशासकीय समस्याही निर्माण झाल्या आहेत. यातील काही समस्या पोलीस विभागाशीच संबंधित आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वत: या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन शहिदांच्या कुटुंबांना दिले. तर समस्या सोडविण्याचे निर्देश पोलीस प्रशासनातील अधिकाºयांनी दिले. दोन्ही बाजूला मध्यस्थी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक महत्त्वाची भूमिका निभाविणार आहेत. त्यामुळे आजपर्यंत ज्या प्रशासकीय समस्यांनी शहिदांचे कुटुंब त्रस्त झाले होते, त्या समस्या पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर सुटण्याची आशा आहे.

Web Title: Shahid celebrates Diwali with SP families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस