नियमित सिंचन सुविधा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:44 PM2019-01-14T22:44:35+5:302019-01-14T22:44:49+5:30

शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सौरऊर्जेवर वीज निर्मिती करण्यासाठी फिडरचे काम सुरू आहे. नियमितपणे विद्युत उपलब्ध करुन देण्यासाठी सोलरवर विद्युत निर्मिती करणार असून फिडर जोडण्याचे काम सुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅनलाईन लोकसंवादादरम्यान म्हटले.

Regular irrigation facilities will be provided | नियमित सिंचन सुविधा देणार

नियमित सिंचन सुविधा देणार

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे आश्वासन : योजनांच्या लाभार्थ्यांशी आॅनलाईन संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सौरऊर्जेवर वीज निर्मिती करण्यासाठी फिडरचे काम सुरू आहे. नियमितपणे विद्युत उपलब्ध करुन देण्यासाठी सोलरवर विद्युत निर्मिती करणार असून फिडर जोडण्याचे काम सुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅनलाईन लोकसंवादादरम्यान म्हटले.
मागेल त्याला शेततळे, विंधन विहिरी, पिक विमा योजना अशा विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. येथील एन. आय.सी. मधील कक्षात जिल्ह्यातील १५ लाभार्थी सहभागी झाले. शेतीतील उत्पादन वाढून त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध योजना शासन राबवित आहे. याकरिता १० हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. राज्यात १६ हजार गावात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे पूर्ण झाली आहेत. १ लाख ३७ हजार शेततळे खोदण्यात आले. याकरिता गेल्या चार वर्षात एकूण ३४ हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली, असे मुख्यमंत्र्यांनी संवादादरम्यान सांगितले.
या लोकसंवाद कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते &महाराष्ट्र एग्रीटेक कार्यक्रमाचे शुभारंभ झाला. राज्यातील दीड कोटी शेतकºयांना या कार्यक्रमांतर्गत लाभ मिळणार आहे. प्रस्थापीत केलेल्या लघु ग्रहाशी थेट संपर्क करुन हवामानाच्या बदलासह, शेतीतील पेरणीपासून तर उत्पन्न हातात येईपर्यंत मधल्या काळात पिकावरील रोगांचीसुध्दा माहिती याअंतर्गत शेतकºयांना थेट उपलब्ध होणार आहे.
संवादाप्रसंगी एन.आय.सी.चे अधिकारी एस. आर. टेंभूर्णे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, तसेच शेतकरी भोलेश समर्थ, रामकृष्ण तामशेटवार, दिलीप भुरसे, मोतीराम सेलोटे, यमराज बारसागडे, पुडलीक कोठारे, शामराव सातपुते, नेमाजी उंदिरवाडे, दिवाकर वाणी, प्रशांत वाघरे, संजय निखारे, मनोज नैकलवार, राजेश मेश्राम, देवेंद्र सरकार उपस्थित होते.

Web Title: Regular irrigation facilities will be provided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.