रबी पिकांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:35 AM2018-11-14T00:35:44+5:302018-11-14T00:38:00+5:30

सप्टेबर महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे रबी पिकांची पेरणी करूनही पीक हाती येणार नाही, याची शाश्वती शेतकऱ्यांना झाली असल्याने काही शेतकऱ्यांनी रबी पिकांची पेरणी थांबविली आहे.

Rabi crops also hit | रबी पिकांनाही फटका

रबी पिकांनाही फटका

Next
ठळक मुद्देलागवडीचे क्षेत्र घटणार : अनेक शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सप्टेबर महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे रबी पिकांची पेरणी करूनही पीक हाती येणार नाही, याची शाश्वती शेतकऱ्यांना झाली असल्याने काही शेतकऱ्यांनी रबी पिकांची पेरणी थांबविली आहे. त्यामुळे यावर्षी रबी पिकांचे क्षेत्र घटण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रबीचे सर्वसाधारण २८ हजार ४०० हेक्टर क्षेत्र आहे. मागील वर्षी २२ हजार हेक्टरवर रबी पिकांची लागवड करण्यात आली होती. काही शेतकरी धानपीक निघल्यानंतर त्याच धानाच्या बांधीत रबी पिकांची लागवड करतात. यासाठी मात्र जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी पावसाने सप्टेंबर महिन्यापासून उसंत घेतल्याने जमिनीतील ओलावा नष्ट झाला आहे. त्यामुळे पिकाची पेरणी करणे शक्य नाही. जवळपासचे नदी, नाल्यांच्या पाण्याची पातळी सुध्दा मागील वर्षीच्या तुलनेत घटली आहे. त्यामुळे सिंचन करणेही शक्य नसल्याचे दिसून येते.
रबी हंगामात प्रामुख्याने हरभरा, लाखोळी, मुग, उडीद, बरबटी, कुरता, पोपट, जवस, भूईमूग, गहू, मका या पिकांची लागवड केली जाते. रबी पिकांचे उत्पादन कमी असले तरी या पिकांच्या लागवडीचा खर्च सुध्दा कमी आहे. त्यामुळे त्याचबरोबर धानपीक निघल्यानंतर शेती पडीक राहण्याऐवजी या पिकांची लागवड केली जाते. पूर्वी ज्वारी, जवस या पिकांचे उत्पादन घेतले जात होते. मात्र या पिकांचे उत्पादन अतिशय कमी होत असल्याने शेतकरी आता मका पिकाकडे वळला आहे. मका पिकाला गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन योग्य आहे. त्यामुळे शेतकरी या पिकाला पसंती देत असून दरवर्षी या पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मागील वर्षी सुमारे तीन हजार हेक्टरवर मक्याची लागवड केली होती. यावर्षी मक्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
कडधान्याचे क्षेत्र घटले
कडधान्यामध्ये मूग, उडीद, बरबटी, कुरता, चवळी, वाल, पोपट यांचा समावेश होतो. मात्र शेतकरी या पिकांकडे पाठ फिरवित इतर नगदी पिकांची लागवड करीत असल्याचे दिसून येते. मूग, उडीदाचे उत्पादन होणाऱ्या जमिनीत आता सोयाबिन, कापूस या पिकांची लागवड केली जात आहे. कापूस पीक जवळपास मार्चपर्यंत राहत असल्याने रबी पिकांची लागवड करणे शक्य होत नाही.

Web Title: Rabi crops also hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.