उत्कृष्ट सहकारी पतसंस्थांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:29 PM2019-02-25T22:29:45+5:302019-02-25T22:30:12+5:30

गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरिक तथा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संघाच्या वतीने आयोजित सहकार प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात जिल्ह्यातील उत्कृष्ट सहकारी पतसंस्थांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Pride of Excellent Co-operative Credit Societies | उत्कृष्ट सहकारी पतसंस्थांचा गौरव

उत्कृष्ट सहकारी पतसंस्थांचा गौरव

Next
ठळक मुद्देजीएसटी, आयकर व आव्हानांवर मंथन : सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरिक तथा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संघाच्या वतीने आयोजित सहकार प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात जिल्ह्यातील उत्कृष्ट सहकारी पतसंस्थांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पतसंस्था संघ गडचिरोलीच्या वतीने २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात तीन दिवसीय सहकार प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष प्राचार्य खुशाल वाघरे होते. प्रमुख अतिथी म्हणून जगदीश किल्लोड, राजेंद्र घाटे, सातपुते, एस.व्ही.दुमपट्टीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यशाळेत सहकारी पतसंस्थांच्या कामामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व, सहकारी पतसंस्थांचे कर्ज वाटप व कर्ज वसुली, जीएसटी व आयकर कायदा, सहकारी पतसंस्थांपुढील आव्हाने व त्यावरील उपाययोजना, तसेच ९७ वी घटना दुरूस्ती आदी विषयांवर रूपेशकुमार घागी, सहकारी संघाचे सेवानिवृत्त मुख्याधिकारी डी.एन.काकडे, जगदीश किल्लोड, प्राचार्य धनंजय गाडगिळ, राजेंद्र घाटे आदींनी मार्गदर्शन केले.
संचालन संघाचे व्यवस्थापक बी.एम.नागापुरे यांनी केले तर आभार शेषराव येलेकर यांनी मानले. सदर प्रशिक्षण कार्यशाळेला जिल्हाभरातील जवळपास ८५ सहकारी संस्थांचे सभासद, कर्मचारी उपस्थित होते.
सहकारी पतसंस्था जिल्हा संघाच्या वतीने दरवर्षी सहकार जनजागृतीबाबत अशाप्रकारची प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाते.
या सहकारी पतसंस्थांचा पुरस्काराने सन्मान
‘अ’ गटातून जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ तांत्रिक कर्मचारी सहकारी पतसंस्था, गडचिरोली यांना मिळाला. द्वितीय पुरस्कार शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सेवकांची सहकारी पतसंस्था गडचिरोलीला प्राप्त झाला. ‘अ’ गटातून तालुकास्तरावरील प्रथम क्रमांक वनकर्मचारी सहकारी पतसंस्था वडसा, द्वितीय क्रमांक प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था कुरखेडा. ‘ब’ गटातून जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांक दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था गडचिरोली, द्वितीय क्रमांक प्रगती नागरी सहकारी पतसंस्था, आलापल्ली. तसेच ‘ब’ गटातून तालुकास्तरावरील प्रथम क्रमांक गृहलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था गडचिरोली व द्वितीय क्रमांक राधाकृष्ण महिला नागरी सहकारी पतसंस्था, गडचिरोली यांना मिळाला.

Web Title: Pride of Excellent Co-operative Credit Societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.