कुलिंगच्या नावाखाली सिरोंचात लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:33 PM2019-04-29T22:33:07+5:302019-04-29T22:34:07+5:30

प्रत्येक शीतपेयाच्या बॉटलवरही किंमत छापली राहते. याच किमतीला शीतपेयांची विक्री करणे गरजेचे असताना दुकानदार छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने शीतपेयांची विक्री करीत आहेत. याबाबत एखाद्या ग्राहकाने कारण विचारल्यास शीतपेय थंड करण्याचे चॉर्जेस असल्याचे सांगितले जाते. मात्र ही ग्राहकांची एकप्रकारची लूट आहे.

Plunder in the name of the castings | कुलिंगच्या नावाखाली सिरोंचात लूट

कुलिंगच्या नावाखाली सिरोंचात लूट

Next
ठळक मुद्देग्राहक अनभिज्ञ : १६ रुपयांची पाण्याची बॉटल विकली जाते २० रुपयाला

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : प्रत्येक शीतपेयाच्या बॉटलवरही किंमत छापली राहते. याच किमतीला शीतपेयांची विक्री करणे गरजेचे असताना दुकानदार छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने शीतपेयांची विक्री करीत आहेत. याबाबत एखाद्या ग्राहकाने कारण विचारल्यास शीतपेय थंड करण्याचे चॉर्जेस असल्याचे सांगितले जाते. मात्र ही ग्राहकांची एकप्रकारची लूट आहे.
सिरोंचात १० रुपयांचे शीतपेयाचे पॉकेट १३ रुपयाला विकले जाते. दही व काही शीतपेयांच्या पॉकेटची किंमत १५ रुपये असताना त्यासाठी १८ रुपये आकारले जातात. पाण्याच्या बॉटलची किंमत १६ रुपये असताना सरसकट २० रुपये आकारले जात आहेत. छापील किमतीपेक्षा अधिक किमतीला वस्तूची विक्री करणे हे कायद्यान्वये गुन्हा आहे. मात्र याला न जुमानताच दुकानदार शीतपेयांची विक्री करीत आहेत. ग्राहकही वाद नको म्हणून दुकानदार म्हणेल तेवढे पैसे देत आहेत. एखाद्यावेळेस विक्रेत्याने अधिक किमतीबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यास त्याला खडे बोल सुनावले जाते.
ग्राहकांच्या चुप्पीचा दुकानदारांकडून गैरफायदा उचलला जात आहे. छापील किमतीवर सर्व करासहीत असा स्पष्ट उल्लेख कंपनीकडून केला राहतो. याचा अर्थ सदर वस्तू त्याच किमतीला विकायची राहते. या किमतीमध्ये ठोक व किरकोळ व्यापाऱ्याचा नफा, तसेच कुलिंगसाठी येणारा खर्च आदी अंतर्भूत असतो. मात्र याला न जुमानताच दुकानदार अधिक किमतीने विक्री करीत आहेत. अधिकच्या किमतीबाबत ग्राहकही प्रशासनाकडे तक्रार करीत नसल्याने कारवाई करणे शक्य होत नाही.
सांगितले जाते कमी मार्जिनचे कारण
शीतपेयांवर अत्यंत कमी प्रमाणात दुकानदारांना नफा मिळतो. त्यातही शीतपेय थंड करून ठेवावी लागतात. त्यासाठी अधिकच्या वीज बिलाचा भूर्दंड दुकानदारांवर पडतो, असे कारण सांगितले जाते. मात्र हे कारण सयुक्तिक नाही. कारण चिल्लर दुकानदारांचा नफा समाविष्ट करूनच छापील किंमत दिली जाते. सर्वच वस्तू छापील किमतीवर विकल्या जात असताना शीतपेय मात्र याला अपवाद आहेत. ते छापील किमतीपेक्षा अधिक दराने विकले जात आहेत.

Web Title: Plunder in the name of the castings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.