नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:19 PM2017-10-01T23:19:43+5:302017-10-01T23:19:54+5:30

आपल्या देशातील काही भागात तसेच गडचिरोलीत माओवादी, नक्षलवादी चळवळ असल्याने विकासकामांना खिळ बसली आहे. ही माओवादी चळवळ संपुष्टात आणण्यासाठी केंद्रीय पोलीस दल व गडचिरोली पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे.

Naxalites must take away weapons | नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकावी

नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकावी

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे आवाहन : धानोराच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये शस्त्रपूजा

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : आपल्या देशातील काही भागात तसेच गडचिरोलीत माओवादी, नक्षलवादी चळवळ असल्याने विकासकामांना खिळ बसली आहे. ही माओवादी चळवळ संपुष्टात आणण्यासाठी केंद्रीय पोलीस दल व गडचिरोली पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. नक्षलवाद व आतंकवादाचा बिमोड करण्यासाठी तसेच देशाच्या संरक्षणासाठी आमचे सैनिक दल रात्रंदिवस पहारा देत आहेत. नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ) व महाराष्टÑ पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने सीआरपीएफ बटालियन ११३ च्या कॅम्पमध्ये शनिवारी दसरानिमित्त शस्त्रपुजेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, सीआरपीएफचे पोलीस महानिरिक्षक राजकुमार, महाराष्टÑ पोलीस अंकूश शिंदे, पोलीस उपमहानिरिक्षक टी. शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, महेंद्र पंडीत, समीर साळवे, सीआरपीएफ ११३ बटालियनचे कमांडंट एन. शिवशंकरा, उप कमांडंट सपन सुमन, कैलाश गंगावने, सहायक कमांडंट धनराज, वैद्यकीय अधिकारी डॉ. वरूण मिश्रा, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, धानोराच्या नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर, पं.स. सभापती अजमन राऊत, पं.स. उपसभापती अनुसया कोरेटी, तहसीलदार महेंद्र गणवीर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना नामदार अहीर म्हणाले, सीआरपीएफ जवान व पोलीस जवानांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण धानोराला भेट दिली. जनतेचा लोकशाहीवर विकास आहे. म्हणून मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
जवानांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्टÑ पोलीस व सीआरपीएफ जवान यांच्यात समन्वय असून दोन्ही विभाग खाद्यांला खांदा लावून संरक्षणाचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यात महाराष्टÑ अग्रेसर आहे, असेही नामदार अहीर म्हणाले.
याप्रसंगी नामदार अहीर यांनी सीआरपीएफ पोलीस जवानांशी विविध समस्यासंदर्भात हितगुज केली. कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी व पोलीस जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झाडू लावला .....
शनिवारी नामदार हंसराज अहीर यांनी बाजारवार्डातील दुर्गा मातेचे दर्शन घेतले. तसेच या परिसरात आयोजित स्वच्छता अभियान मोहिमेत सहभाग घेतला. दरम्यान त्यांनी दुर्गा मातेच्या परिसरात झाडू लावून स्वच्छता केली. याप्रसंगी खासदार अशोक नेते, ताराबाई कोटांगले, साईनाथ साळवे, अनंत साळवे, महादेव गणोरकर, कैलाश गुंडावार, शशिकांत साळवे, लता पुंगाटे, भूपतवार, मुन्ना चंदेल, राकडे महाराज, गजानन साळवे तसेच गडचिरोलीचे नगरसेवक प्रमोद पिपरे, प्रकाश अर्जुनवार, डॉ. भारत खटी, प्रशांत वाघरे, बाबुराव कोहळे आदी उपस्थित होते.

Web Title: Naxalites must take away weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.