जीव महत्त्वाचाच, पण रोजगाराचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:12 AM2019-01-20T01:12:34+5:302019-01-20T01:14:07+5:30

बुधवारच्या ट्रक-बस अपघातानंतर एटापल्लीत झालेल्या आंदोलनाने जिल्ह्याची राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा हलली. या आंदोलनामुळेच मृतांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या मदतीचा आकडा वाढला. आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेमुळे पालकमंत्री, खासदार, माजी राज्यमंत्री, माजी आमदारांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही एटापल्लीत जावे लागले.

Life is important, but what about employment? | जीव महत्त्वाचाच, पण रोजगाराचे काय?

जीव महत्त्वाचाच, पण रोजगाराचे काय?

Next

मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुधवारच्या ट्रक-बस अपघातानंतर एटापल्लीत झालेल्या आंदोलनाने जिल्ह्याची राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा हलली. या आंदोलनामुळेच मृतांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या मदतीचा आकडा वाढला. आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेमुळे पालकमंत्री, खासदार, माजी राज्यमंत्री, माजी आमदारांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही एटापल्लीत जावे लागले. हा एक प्रकारे आंदोलनकर्त्यांचा विजयच म्हणावा लागेल. पण कितीही आर्थिक मदत दिली तरी गेलेला जीव परत येणार नाही. त्यामुळे जीवाची भरपाई पैशात तोलता येणार नाही. जी काही आर्थिक मदत मिळेल त्यातून कुटुंबियांना नक्कीच दिसाला मिळणार असला तरी ही मदत आयुष्याला पुरणार नाही. त्यांना रोजगार कसा मिळेल याचा विचार करावा लागणार आहे. केवळ त्या मृत लोकांच्या परिवारातील सदस्यालाच नाही तर या परिसरात राहणाºया शेकडो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम कसे मिळेल याचा आंदोलनकर्त्यांनी शांत डोक्याने विचार करणे गरजेचे आहे.
नक्षलवाद, विपरित भौगोलिक स्थिती, वन कायदा अशा एक ना अनेक अडचणींमुळे दक्षिण गडचिरोली भागातील नागरिकांच्या वाट्याला आतापर्यंत खरा विकास आलाच नाही. लोहखनिजाची देण असतानाही विविध अडचणींचा विचार करून कोणत्याही कंपनीने या भागातील लोहखनिज काढण्याची किंवा लोहप्रकल्प उभारण्याची हिंमत केली नाही. लॉयड्स मेटल्स कंपनीने ही हिंमत दाखविल्याने या भागातील नागरिकांनी खरे तर त्यांच्या निर्णयाचे स्वागतच करायला पाहीजे होते. पण तसे झाले नाही. लोहखाणीचे काम सुरू झाल्यापासून अनेक स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळाले. कोनसरी येथील लोहप्रकल्पाच्या उभारणीनंतर त्या प्रकल्पात अनेकांना स्थायी रोजगाराची संधी मिळणार आहे. त्यासाठी एटापल्ली तालुक्यातल्या बेरोजगारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्या प्रकल्पात नोकरी देण्यास प्राधान्य देण्याची घोषणाही झाली आहे. असे असताना लोहखनिज काढणारे आपले शत्रू असल्याप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार करणे कितपत योग्य आहे, याचा नागरिकांनी शांत डोक्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
अपघातानंतर गावकºयांनी संतापाच्या भरात लोहखनिज वाहतुकीसाठी जाणारे १५ ट्रक जाळले. यात संबंधित वाहतूकदाराचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे कायदा हाती घेऊन केलेली अशी हिंसक कृती निश्चितच समर्थनिय नाही. ट्रक वाहतुकीमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्याचा नागरिकांना होणारा त्रास दूर झालाच पाहीजे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने या मार्गाचे कंत्राटही दिले आहे. पण रस्त्याचे काम सुरू का झाले नाही, यासाठी आवाज उठवल्या गेला पाहीजे. कोनसरीच्या लोहप्रकल्पाचे काम सुरू का झाले नाही, यासाठी आवाज उठवला पाहीजे. पण अशा सकारात्मक गोष्टींसाठी आंदोलन न करता काम बंद पाडण्यासाठी जर प्रयत्न होत असेल तर हे आपल्याच पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे. अशाने भविष्यात स्थानिक लोकांना रोजगार देणारा कोणताही उद्योग या भागात येण्यास तयार होणार नाही.
इतक्या वर्षात या भागातील लोक ‘जैसे थे’ परिस्थितीत आहेत. ग्रामसभांना अधिकार मिळूनही त्यांच्या जीवनमानात फारसा बदल होऊन रोजगाराच्या संधी वाढलेल्या नाही. मग बेरोजगारांच्या आशा पल्लवित करणाºया कोणत्याही उद्योगधंद्यांना बंद पाडण्याचे कारस्थान रचले जात असेल तर गावकºयांनी त्यात वहावत जावे की नाही त्यांनी विचार करणे गरजेचे आहे.

Web Title: Life is important, but what about employment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.