जोगीसाखरात वृक्षांची अवैध तोड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 01:21 AM2019-02-07T01:21:08+5:302019-02-07T01:21:50+5:30

आरमोरी तालुक्यातील जोखीसाखरा येथील नर्सरीतून अवैध वृक्षतोड करून लाकडांची वाहतूक केली, असा आरोप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा शिवसेना नेते हरीश मने यांनी केला आहे.

Jogisakhara tree illegally broken? | जोगीसाखरात वृक्षांची अवैध तोड?

जोगीसाखरात वृक्षांची अवैध तोड?

Next
ठळक मुद्देविविध प्रकारची झाडे : वनविभागाने चौकशी करावी, अशी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील जोखीसाखरा येथील नर्सरीतून अवैध वृक्षतोड करून लाकडांची वाहतूक केली, असा आरोप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा शिवसेना नेते हरीश मने यांनी केला आहे.
अवैध वृक्षतोड असल्याचे लक्षात आल्यानंतर हरीश मने यांनी बिटातील अधिकारी गोटेफोडे यांना फोनवरून माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडीओ शुटींग केले. त्यात साग, जांभळी व आंब्याच्या तसेच इतर जातीच्या झाडांची अवैध तोड झाली असल्याचा आरोप मने यांनी केला आहे. आरमोरी-जोगीसाखरा मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम सुरू असून त्यावर पांढरा व लाल पट्टा मारलेले आंब्याची झाडेही तोडली आहेत. तोडलेली झाडे एमएच ३१ सीएन ४४७३ क्रमांकाच्या क्रेनने एमएच ३३ एफ ३२८७ क्रमांकाच्या ट्रॅक्टवर मांडून त्याची वाहतूक केली जात होती. याबाबत वनरक्षक गोटेफोड यांना कळविण्यात आले. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. ५ फेब्रुवारी रोजी इटियाडोह प्रकल्प आरमोरी येथील अधिकारी वैद्य तसेच अंतरजी मायनरचे अध्यक्ष मनोहर गोनाडे यांना बोलविण्यात आले. या पाहणीदरम्यान सात ते आठ आंब्याची झाडे तोडल्याचे दिसून आले. यावरून वनविभाग, सिंचन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीवरील झाडे बेकायदेशीररीत्या तोडण्यात आली आहेत. सदर लाकडे अंतरंजी येथे ओढत नेऊन शाळेच्या परिसरात रात्रीच ठेवण्यात आली. हॅमर मारलेला शिक्का खोडतोड केला आहे.
या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हरीश मने, नारायण धकाते, राजू अंबानी, किशोर हाडगे, राजेंद्र मने, संजय डोकरे, भास्कर वैद्य, वसंत समर्थ, राजू मने, मनोहर गोनाडे, रमेश धकाते, धर्माजी धकाते यांनी केली आहे.
या प्रकरणाबाबत लोकमतने आरएफओ एस.एम.डोंगरवार यांना विचारणा केली असता, योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Jogisakhara tree illegally broken?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.