आम्हाला न्याय मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:47 PM2017-10-18T23:47:51+5:302017-10-18T23:48:03+5:30

तालुक्यातील नेलगुंडा व गोंगवाडा येथील नागरिकांना पोलिसांनी कारण नसताना पोलीस ठाण्यात नेऊन अत्याचार करीत आहेत.

Get justice for us | आम्हाला न्याय मिळवून द्या

आम्हाला न्याय मिळवून द्या

Next
ठळक मुद्देनिवेदन सादर : आदिवासी बांधवांची प्रकाश आमटेंकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील नेलगुंडा व गोंगवाडा येथील नागरिकांना पोलिसांनी कारण नसताना पोलीस ठाण्यात नेऊन अत्याचार करीत आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्याकडे निवेदनातून ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांनी म्हटले आहे की, ११ आॅक्टोबर रोजी गोंगवाडा येथील रहिवासी रैनु काना पुंगाटी याला पोलिसांनी घरून नेले. त्याच्या चौकशीनंतर धोडराज येथील कोरके नेंडा पल्लो, झुरू चिन्ना पुंगाटी, संतोष नारायण भांडेकर, अशोका फकीरा सोमनकर, बंडू चिन्ना गेडाम तसेच मेडपल्ली येथील वांगे जोगी मज्जी याला पोलिसांनी नेले. मात्र त्यांच्या नातेवाईकांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली. तसेच त्यांना मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे.
आदिवासींनी गावातील गोटूलमध्ये बसून बैठक घेवू नये, दुसºया गावात जावू नये, असेही पोलिसांनी बजावल्याचे निवेदनात नमूद केले आहे. आम्ही राहत असलेल्या गावांमधील परिस्थिती आपणास माहित असून अशिक्षित आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, असे डॉ. आमटे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन अनिकेत आमटे यांनी स्वीकारले.
मारहाण केली नाही-राजपूत
याबाबत ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकारी अंजली राजपूत यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या नागरिकांना कायदेशिरपणे अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार केला जात नसून त्यांच्या राहण्याची तसेच जेवनाचीसुध्दा व्यवस्था करण्यात आलेली आहे. अटक करण्यात आलेल्यांवर कसल्याही प्रकारचा पोलिसांनी दबाव टाकलेला नसल्याची माहिती राजपूत यांनी दिली आहे.

Web Title: Get justice for us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.