गडचिरोलीत नक्षल्यांनी जाळली चार वाहने; गावकऱ्यांना दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:39 PM2019-03-13T13:39:46+5:302019-03-13T13:41:31+5:30

एटापल्लीपासून ३२ कि.मी. अंतरावर असलेल्या पुस्के गावात सुरू असलेल्या रस्ता बांधणीच्या कामाला विरोध दर्शवून नक्षल्यांनी चार सरकारी वाहनांना बुधवारी पहाटेच्या सुमारास पेटवून दिल्याची घटना घडली.

Four vehicles burnt by the Naxalites in Gadchiroli | गडचिरोलीत नक्षल्यांनी जाळली चार वाहने; गावकऱ्यांना दमदाटी

गडचिरोलीत नक्षल्यांनी जाळली चार वाहने; गावकऱ्यांना दमदाटी

Next
ठळक मुद्देमोठ्या प्रमाणावर नक्षली आले होतेकाम बंद करण्यासाठी केली दमदाटी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: एटापल्लीपासून ३२ कि.मी. अंतरावर असलेल्या पुस्के गावात सुरू असलेल्या रस्ता बांधणीच्या कामाला विरोध दर्शवून नक्षल्यांनी चार सरकारी वाहनांना बुधवारी पहाटेच्या सुमारास पेटवून दिल्याची घटना घडली.
एटापल्ली ते गट्टा मार्गावर गेल्या ४-५ दिवसांपासून मुरुम व गिट्टी टाकून रस्ते बनवण्याचे काम सुरू आहे. या भागातील नागरिकांनी रस्त्याची मागणी जुनी होती. रस्ते नसल्याने या भागातील अनेक गरोदर स्त्रिया प्रवासादरम्यान मृत्युमुखी पडल्या आहेत. हे काम अर्ध्यावर आले असताना, बुधवारी पहाटेच्या सुमारास पुस्के गावातील पोलिस पाटलांच्या घरी वास्तव्याला असलेल्या वाहन चालकांना या नक्षल्यांनी झोपेतून उठवले. तसेच गावकऱ्यांनाही त्यांनी उठवले. सुरू असलेले रस्त्याचे काम तात्काळ बंद करा अशी दमदाटी केली. त्यावर गावकऱ्यांनी रस्ते बांधणीचे काम रोखू नका, ते गावासाठी आवश्यक आहे अशी विनंती नक्षल्यांना केली. ती विनंती धुडकावून लावत नक्षल्यांनी वाहनचालकाला गावाबाहेर नेऊन दमदाटी केली. नंतर त्यांनी डिझेल शिंपडून चारही वाहनांना आग लावून दिली. या आगीत ही सर्व वाहने जळून खाक झाली.

Web Title: Four vehicles burnt by the Naxalites in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.