पाच दिवसांत साडेतीन लाखांची दारू जप्त, गडचिरोली पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 06:48 PM2018-02-14T18:48:21+5:302018-02-14T18:48:46+5:30

स्थानिक गुन्हे शाखा व महाशिवरात्री उत्सवातील सुरक्षा पथकाने गेल्या पाच दिवसांत जिल्ह्याच्या विविध भागांत धाडसत्र राबवून एकूण ३ लाख ६१ हजार ७८० रूपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली.

Five-and-a-half rupees liquor seized in five days | पाच दिवसांत साडेतीन लाखांची दारू जप्त, गडचिरोली पोलिसांची कारवाई

पाच दिवसांत साडेतीन लाखांची दारू जप्त, गडचिरोली पोलिसांची कारवाई

Next

गडचिरोली  - स्थानिक गुन्हे शाखा व महाशिवरात्री उत्सवातील सुरक्षा पथकाने गेल्या पाच दिवसांत जिल्ह्याच्या विविध भागांत धाडसत्र राबवून एकूण ३ लाख ६१ हजार ७८० रूपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एक दुचाकीही ताब्यात घेतली आहे. या कारवाईने अवैैध दारूविक्रेत्यांची धाबे दणाणले आहेत. 

पोलिसांनी १० फेब्रुवारीला जयरामपूर येथे धाड टाकून २ लाख ८८ हजार रूपये किमतीच्या देशी दारूच्या ४८ पेट्या जप्त केल्या. १३ फेब्रुवारीला अहेरी तालुक्याच्या मोसम गावात धाड टाकून ४६ हजार रूपयांची दारू जप्त केली. १४ फेब्रुवारीला नवेगाव, मुरखळा येथे धाड टाकून २७ हजार ७८० रूपयांची दारू व ५५ हजार रूपयांचे दुचाकी वाहन जप्त केले. या प्रकरणातील आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके व कर्मचाºयांनी केली.

Web Title: Five-and-a-half rupees liquor seized in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.