अहेरीतील उपजिल्हा रुग्णालयाला आग; रुग्णांची धावपळ, साहित्य जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 03:39 PM2018-02-05T15:39:44+5:302018-02-05T15:40:03+5:30

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महत्वपूर्ण शहर आणि आत्राम राजघराण्याचे मुख्यालय असलेल्या अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. यात जीवित हाणी झाली नसली तरी टेलिमेडिसीन रुममधील संगणक, सोनोग्राफी मशिन, एअर कंडिशनर असे जवळपास ५० लााखांचे साहित्य जळून खाक झाले. 

Fire at sub-district hospital; Patients rush, burns the material | अहेरीतील उपजिल्हा रुग्णालयाला आग; रुग्णांची धावपळ, साहित्य जळून खाक 

अहेरीतील उपजिल्हा रुग्णालयाला आग; रुग्णांची धावपळ, साहित्य जळून खाक 

Next

अहेरी (गडचिरोली)  : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महत्वपूर्ण शहर आणि आत्राम राजघराण्याचे मुख्यालय असलेल्या अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. यात जीवित हाणी झाली नसली तरी टेलिमेडिसीन रुममधील संगणक, सोनोग्राफी मशिन, एअर कंडिशनर असे जवळपास ५० लााखांचे साहित्य जळून खाक झाले. 

विद्युत तारांमधील शॉर्ट सर्किटने ही आग लागली. ५० खाटांच्या या रुग्णालयात जवळपास ७० रुग्ण भरती होते.  टेलिमेडिसीन रुममधील  विद्युत तारांनी पेट घेतल्याचे लक्षात येताच सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले. महावितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी माहिती मिळताच विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर रुग्णालयातील अग्निशमन यंत्रांनी आणि टाकीतील पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. विशेष म्हणजे आग विझविण्यासाठी अहेरी नगर पंचायतची अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरली. सात महिन्यांपूर्वीच नगर पंचायतला ८५ लाख रुपयांच्या खर्चातून अग्निशमन वाहन देण्यात आले. मात्र प्रशिक्षित कर्मचारीच नसल्यामुळे हे अग्निशमन वाहन शोभेचे ठरले. ही आग विझविण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होऊ न शकल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

रुग्ण भरती असलेल्या दोन्ही वॉर्डमध्ये ही आग पसरली नाही. मात्र अंतर्गत भागात सर्वत्र धूर पसरल्याने भरती असलेल्या रुग्णांची तारांबळ उडाली. त्यांना दुस-या एका वॉर्डमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे. 

रुग्णालयाची वायरिंग खूप जुनी आहे. मशिनरी आधुनिक लागल्या असल्यामुळे त्याअनुषंगाने वायरिंगमध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. वायरिंग दुरूस्तीसाठी यापूर्वीच जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निधीची मागणी केली आहे. मात्र निधी मिळाला नसल्यामुळे दुरूस्ती होऊ शकली नाही.
- डॉ.कन्ना मडावी, 
अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अहेरी

Web Title: Fire at sub-district hospital; Patients rush, burns the material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग