संतप्त अंगणवाडी महिलांचे जि.प.समोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 10:25 PM2018-08-09T22:25:35+5:302018-08-09T22:27:14+5:30

अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या व मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा संघटक देवराव चवळे यांच्या नेतृत्वात आॅगस्ट क्रांतीदिनी गुरूवारला जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आली.

Due to aggravating movement of angry Anganwadi women in front of ZP | संतप्त अंगणवाडी महिलांचे जि.प.समोर धरणे आंदोलन

संतप्त अंगणवाडी महिलांचे जि.प.समोर धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्देकर्मचारी आक्रमक : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या व मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा संघटक देवराव चवळे यांच्या नेतृत्वात आॅगस्ट क्रांतीदिनी गुरूवारला जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आली. या आंदोलनादरम्यान शेकडो महिला कर्मचाऱ्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात नारेबाजी केली.
यावेळी देवराव चवळे, विनोद झोडगे यांनी महिलांना संबोधित केले. त्यानंतर जि.प.चे महिला व बाल कल्याण अधिकारी लामतुरे यांनी आंदोलस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. सदर निवेदन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
या निवेदनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षकेचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन, इंधन बिल व प्रवास भत्ता देण्यात यावा, दर महिन्याला ५ तारखेच्या आत मानधन देण्यात यावे, प्रत्येक अंगणवाडी केंद्राला स्वतंत्र इमारतीचे बांधकाम करावे, मे महिन्यात अंगणवाडीला सुटी देण्यात यावी आदीसह विविध मागण्यांचा समावेश आहे. सदर आंदोलनात ४०० वर महिला सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Due to aggravating movement of angry Anganwadi women in front of ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.