शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:55 AM2018-08-02T00:55:49+5:302018-08-02T00:56:35+5:30

जिल्ह्यातील काही कर्जदार शेतकऱ्यांची नावे कर्जमाफी यादीत असतानाही त्यांना लाभ मिळाला नाही. याची चौकशी करण्यात यावी, काही पात्र लाभार्थी अद्याप योजनेपासून वंचित आहेत त्यांचे पुनर्सर्वेक्षण करण्यात यावे.

Do not deprive farmers of debt waiver | शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नका

शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नका

googlenewsNext
ठळक मुद्देचौकशी करण्याची मागणी : शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : जिल्ह्यातील काही कर्जदार शेतकऱ्यांची नावे कर्जमाफी यादीत असतानाही त्यांना लाभ मिळाला नाही. याची चौकशी करण्यात यावी, काही पात्र लाभार्थी अद्याप योजनेपासून वंचित आहेत त्यांचे पुनर्सर्वेक्षण करण्यात यावे. नवीन पीक कर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात कर्जमाफी योजनेतील घोळ दूर करण्यात यावा, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, पात्र लाभार्थ्यांना वहीवाटीचे पट्टे द्यावे, घरगुती व कृषी पंपाच्या भरमसाठ वीज बिलाची चौकशी करावी, जिल्हा निवड मंडळाची स्थापना करून जिल्हातील नोकर भरतीत स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे, सर्वेक्षण करून पात्र गरीब मात्र योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची नावे बीपीएल यादीत समाविष्ट करावी आदी मागण्यांचा समावेश होता.
निवेदन देताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी, माजी जि. प. सभापती निराजंनी चंदेल, तालुका प्रमुख आशिष काळे, शहर प्रमुख संजय देशमुख, कामगार सेना प्रमुख नरेंद्र तिरणकर, न. पं. सभापती पुंडलिक देशमुख, संतोषकुमार भट्टड, नगरसेविका चित्रा गजभिये, अनिता बोरकर, तालुका युवा सेना प्रमुख मोन्टू चव्हाण, शिवराम कापगते, बजरंग बैस, राजू नंदनवार, राकेश चव्हाण, पुरुषोत्तम मडावी हजर होते.

Web Title: Do not deprive farmers of debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.