वडसात शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:01 AM2018-02-02T00:01:56+5:302018-02-02T00:02:33+5:30

उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत २०१७-१८ वर्षात कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून तालुक्यातील वडधा येथील शेतकरी आसाराम लक्ष्मण बाळबुद्धे, अरूण मोहन गायकवाड, काशिनाथ दिनू गायकवाड व इतर शेतकऱ्यांना अनुदानावर आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.

Distribution of tractor to farmers in Vadis | वडसात शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण

वडसात शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण

Next
ठळक मुद्देकृषी यांत्रिकीकरणाकडे वाटचाल : आमदारांच्या हस्ते शेतकऱ्यांना चावी प्रदान

ऑनलाईन लोकमत
देसाईगंज : उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत २०१७-१८ वर्षात कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून तालुक्यातील वडधा येथील शेतकरी आसाराम लक्ष्मण बाळबुद्धे, अरूण मोहन गायकवाड, काशिनाथ दिनू गायकवाड व इतर शेतकऱ्यांना अनुदानावर आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.
यावेळी पं.स. सभापती मोहन गायकवाड, उपसभापती गोपाल उईके, तालुका कृषी अधिकारी अभिजीत धेटे आदी उपस्थित होते. उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत सन २०१७-१८ मध्ये देसाईगंज तालुक्यातील एकूण १०८ शेतकऱ्यांनी विविध अवजारे अनुदानावर मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर केले. सर्व शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली. सर्व शेतकऱ्यांना अवजारे मंजूर करून खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे. यापैकी अवजारे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना आमदारांच्या हस्ते गुरूवारी ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. सदर योजनेचा देसाईगंज तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभिजीत धेडे यांनी केले आहे. शेतकºयांनी शेतीपयोगी कामासाठी शासकीय योजनेचा लाभ घेऊन विविध अवजारे अनुदानावर मिळवावेत, या अवजारांचा योग्य पद्धतीने वापर करावा, असे आवाहन आ. कृष्णा गजबे यांनी केले.
वाटप कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी वाय.पी. रणदिवे, कृषी पर्यवेक्षक एस.टी. मेश्राम, वाय.एल. कुमरे, कृषी सहायक एच.के. दोनाडकर यांच्यासह कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Web Title: Distribution of tractor to farmers in Vadis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.