मळणीयंत्रात अडकून चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:16 PM2018-01-18T23:16:55+5:302018-01-18T23:17:04+5:30

मळणीयंत्राच्या सहाय्याने धानाची मळणी करताना पुंजण्यावरून तोल जाऊन एक पाय मशीनमध्ये गेल्याने यंत्र चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील घोट पोलीस मदत केंद्राच्या हद्दित पुसगुडा येथे बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

 Death of the driver stuck in the cottage | मळणीयंत्रात अडकून चालकाचा मृत्यू

मळणीयंत्रात अडकून चालकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे पुसगुडातील घटना : पुंजण्यावरून पाय घसरला

लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : मळणीयंत्राच्या सहाय्याने धानाची मळणी करताना पुंजण्यावरून तोल जाऊन एक पाय मशीनमध्ये गेल्याने यंत्र चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील घोट पोलीस मदत केंद्राच्या हद्दित पुसगुडा येथे बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. साईनाथ समरू पोटावी (२५) रा. पुसगुडा असे मृतक मळणी यंत्र चालकाचे नाव आहे.
साईनाथ पोटावी याने धान मळणीचा व्यवसाय करण्यासाठी थ्रेशर मशीन खरेदी केली. तो गाव परिसरातील शेतात जाऊन स्वत:च ही मशीन चालवित असे. १७ जानेवारी रोजी थ्रेशर मशीन घेऊन पुसगुडा येथील शेतकरी कवडो दानू कुल्हेटी यांच्या शेतात दुपारी १ वाजता मजुरांसह पोहोचला. यंत्राद्वारे धान मळणी सुरू होती. साईनाथ पोटावी हा धानाच्या पुंजण्यावर चढून धानाचे भारे मशीनमध्ये टाकण्यासाठी गेला असता, त्याचा पाय पुंजण्यावरून घसरल्याने तो थ्रेशर मशीनमध्ये जाऊन अडकला. त्याचा उजवा पाय व अर्धा शरीर मशीनमध्ये फसल्याने तो मृत्यू पावला. सदर घटनेतील ट्रॅक्टरचा क्रमांक एमएच ३३ एफ ३८०७ असा असून साईनाथ पोटावी हा ट्रॅक्टर व थ्रेशर मशीनचा मालक-चालक होता.

Web Title:  Death of the driver stuck in the cottage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.