बेडगाव घाट आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:49 PM2018-03-24T22:49:21+5:302018-03-24T22:49:21+5:30

चार दिवसांपूर्वी पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीला जंगलातील वनव्यांची तीव्रता जाणवत नव्हती.

Bedgaon ferry firefighters | बेडगाव घाट आगीच्या भक्ष्यस्थानी

बेडगाव घाट आगीच्या भक्ष्यस्थानी

googlenewsNext
ठळक मुद्देवन विभागाचे दुर्लक्ष : आरमोरी, देलनवाडी, कुरखेडा वनपरिक्षेत्रात वणवा

आॅनलाईन लोकमत
वैरागड : चार दिवसांपूर्वी पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीला जंगलातील वनव्यांची तीव्रता जाणवत नव्हती. मात्र मागील दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने अनेक ठिकाणी जंगलांना आगी लागल्या असून देलनवाडी, कुरखेडा, आरमोरी वन परिक्षेत्रात वनवे लागले असून पुराडा वन परिक्षेत्राच्या हद्दितील बेडगाव घाटातील जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
वणव्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फायरलाईन जाळल्या जाते. पण या जाड रेषेचा वनवे रोखण्यासाठी कोणताही उपयोग होत नसून उलट फायरलाईनमुळे जंगलांना मोठ्या प्रमाणात आगी लागत आहेत. पानझडीच्या जंगलात आता मोहफूल वेचण्याचा हंगाम सुरू झाला आहे. मोहफूल वेचणारे लोक झाडाखालील पालापाचोळा गोळा करून त्याच ठिकाणी जाळतात. आग न विझवता घरी परततात. त्यामुळे ही आग जंगलात पसरत जाऊन रौद्ररूप धारण करीत आहे. यामध्ये जंगल जळून खाक होत आहे. वनवे लागण्याचे कारण स्पष्ट असताना त्यावर कोणतेही प्राथमिक प्रतिबंधात्मक उपाय केले जात नसल्याने कोट्यवधी रूपयाची वनसंपदा आगीत स्वाहा होत आहे. मात्र याकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.

Web Title: Bedgaon ferry firefighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.