९३ बालकांचे अपंगत्व झाले सुसह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:34 PM2018-01-01T23:34:39+5:302018-01-01T23:35:05+5:30

सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून जिल्हाभरातील गरीब ९३ अपंग बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांचे जगणे सुसह्य झाले आहे.

9 3 Infertility of the child is susceptible | ९३ बालकांचे अपंगत्व झाले सुसह्य

९३ बालकांचे अपंगत्व झाले सुसह्य

Next
ठळक मुद्देसर्वशिक्षा अभियानातून पुढाकार : नागपूर येथील खासगी रूग्णालयात मोफत शस्त्रक्रिया

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून जिल्हाभरातील गरीब ९३ अपंग बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांचे जगणे सुसह्य झाले आहे.
शस्त्रक्रियेच्या माध्यमातून अपंगत्वावर उपचार करता येत असले तरी दोन वेळच्या जेवनाची भ्रांत असलेले पालक आपल्या पाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा खर्च उचलू शकत नाही. परिणामी अपंगत्वाचा भार जीवनभर वाहावा लागते. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली जिल्हा परिषदेने सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून अस्थिव्यंग व बहुविकलांग असलेल्या विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. नागपूर येथील प्रविरा हॉस्पीटलचे संचालक बालअस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विराज शिंगाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविल्याने मागील आठ दिवसात गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ९३ अस्थिव्यंग व बहुविकलांग बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रविरा हॉस्पीटलने या विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया मोफत केली असून त्यांच्या राहण्याचा, जेवनाचा व औषधीचा खर्चही याच रूग्णालयाने उचलला आहे. शस्त्रक्रियेमुळे बालकांचे अपंगत्व नाहिसे झाल्याने पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते.
शस्त्रक्रियेसाठी बालकांची निवड करण्यासाठी सर्व शिक्षा अभियानतर्फे अहेरी व गडचिरोली येथे शिबिराचे आयोजन केले होते. दोन्ही शिबिरांना २३४ अपंग विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्यापैकी १२९ बालकांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी नागपूर येथे प्रत्यक्ष ९३ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सात टप्प्यांमध्ये बालकांना नागपूर येथील प्रविरा हॉस्पीटलमध्ये पाठविण्यात आले. मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, शिक्षणाधिकारी ओमप्रकाश गुडे, डीआयईसीपीडीचे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटील यांच्यासह सर्व शिक्षा अभियानच्या कर्मचाºयांनी पुढाकार घेतला.
जनजागृतीची गरज
गरीब आजारी बालकांवर मोफत उपचार करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढाकार घेतात. मात्र दुर्गम भागातील नागरिकांना याबाबतची माहिती होत नाही. परिणामी त्यांच्यावर उपचार होत नाही. शिक्षण विभागाचे जाळे प्रत्येक गावात पसरले असल्याने याबाबत जनजागृतीची गरज आहे.

Web Title: 9 3 Infertility of the child is susceptible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.