७ हजार शेतकरी ‘सन्मान’साठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 01:43 AM2019-02-25T01:43:38+5:302019-02-25T01:44:48+5:30

महसूल विभागाने केलेल्या छाणनीत धानोरा तालुक्यातील एकूण ७ हजार ३२२ शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी पात्र ठरले आहेत. धानोरा तहसील कार्यालयाच्या सभागृहात रविवारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला धानोराचे तहसीलदार महेंद्र गणवीर, नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष लीना साळवे,

7 thousand farmers are eligible for 'honor' | ७ हजार शेतकरी ‘सन्मान’साठी पात्र

७ हजार शेतकरी ‘सन्मान’साठी पात्र

Next
ठळक मुद्देधानोरा कार्यक्रम : पात्र झालेल्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : महसूल विभागाने केलेल्या छाणनीत धानोरा तालुक्यातील एकूण ७ हजार ३२२ शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
धानोरा तहसील कार्यालयाच्या सभागृहात रविवारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला धानोराचे तहसीलदार महेंद्र गणवीर, नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष लीना साळवे, साईनाथ साळवे, उपसभापती अनुसया कोरेटी, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, पं. स. सदस्य विलास गावळे, तालुका कृषी अधिकारी नीलकंठ बडवाईक, मंडळ कृषी अधिकारी पाठक आदी उपस्थित होते.
धानोरा तालुक्यात नियमित ५ हजार ९२० नियमित शेतकरी व ३ हजार २९५ वनहक्क धारक शेतकरी असे एकूण ९ हजार २१५ शेतकºयांची जमीन २ हेक्टरच्या खाली आहे. तालुक्यात एकूण १४ हजार ३०४ शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी ३ हजार २२२ शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती तहसीलदार गणवीर यांनी कार्यक्रमादरम्यान दिली.
शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र ठरलेल्या तालुक्यातील १० शेतकºयांचा शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे गोरखपूर येथील किसान सन्मान योजनेच्या शुभारंभाप्रसंगी केलेल्या भाषणाचे थेट प्रसारण उपस्थित शेतकºयांना दाखविण्यात आले. उन्नत शेती समृद्ध शेती अंतर्गत अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकºयांना ट्रॅक्टर अनुदानाच्या पत्राचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यविजय शिंगणे, लीलाधर पाठक, जयदेव भाकरे, सोमेश्वर क्षिरसागर, निंबार्ते, खेडकर, वनिश्याम येरमे यांनी सहकार्य केले.
संचालन कृषी सहायक दिनेश पानसे यांनी केले.

Web Title: 7 thousand farmers are eligible for 'honor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी