कृषीपंपासाठी लागणार ६७१ ट्रान्सफॉर्मर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:54 AM2018-12-30T00:54:02+5:302018-12-30T00:54:49+5:30

जिल्ह्यात आता नवीन कृषीपंपाची जोडणी उच्चदाब वाहिणीच्या सहाय्याने केली जाणार आहे. यासाठी जिल्हाभरात ६७१ रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) लागणार आहेत. यामुळे लघुदाब वाहिणीतून होणारी वीज गळती टाळता येणार आहे.

671 Transformers for Agriculture Plants | कृषीपंपासाठी लागणार ६७१ ट्रान्सफॉर्मर

कृषीपंपासाठी लागणार ६७१ ट्रान्सफॉर्मर

googlenewsNext
ठळक मुद्देवीज गळतीला बसणार आळा : उच्चदाब वितरण प्रणाली योजना कार्यान्वित

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात आता नवीन कृषीपंपाची जोडणी उच्चदाब वाहिणीच्या सहाय्याने केली जाणार आहे. यासाठी जिल्हाभरात ६७१ रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) लागणार आहेत. यामुळे लघुदाब वाहिणीतून होणारी वीज गळती टाळता येणार आहे.
कृषीपंपाला आवश्यक तेवढा वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने प्रत्येक शेतकऱ्याच्या कृषीपंपासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर लावून देण्यासाठी राज्य शासनाने ‘उच्चदाब वितरण प्रणाली’ योजना सुरू केली आहे. या प्रणालीअंतर्गत शेतकºयांच्या शेतापर्यंत उच्चदाब वाहिणी (११ केव्ही) टाकली जाणार आहे. त्यामुळे लघुदाब वाहिणीची गरज राहणार नाही. शनिवारी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते पारडी येथील शेतकºयांच्या शेतातील कृषी पंपाची कळ दाबून या योजनेचा शुभारंभ केला. जिल्ह्यात मार्च २०१८ अखेर कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या ८९९ शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. ०.६ किमीपर्यंत वाहिणी लागणाºया ६७१ अर्जदारांच्या जोडण्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून केल्या जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र डीपी बसविली जाणार आहे. या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी काम सुध्दा प्रगतीवर आहेत. गडचिरोली तालुक्यातील पारडी येथील भास्कर शितकुरा गंडाटे तसेच चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील मधुबाई देवतळे यांच्या शेतात उच्चदाब वाहिणीने वीज पुरवठा करण्यात आला आहे. पारडी येथील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन आमदार डॉ. देवराव होळी यांनी स्वत:च्या हाताने कृषीपंप सुरू करून योजनेचा शुभारंभ केला. यावेळी गडचिरोली महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम उपस्थित होते.

२२८ शेतकऱ्यांना मिळणार सौरप्रणाली
ज्या शेतकऱ्यांचे शेत मुख्य लाईनपासून ०.६ किमीपेक्षा अधिक अंतरावर आहे, अशा २२८ शेतकºयांना सौरऊर्जा प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे याही शेतकऱ्यांना बिनाखर्ची वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.
एका ट्रान्सफॉर्मरची किंमत जवळपास अडीच लाख रूपये आहे. एवढ्या किमतीचे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेत जवळजवळ आहे, अशा दोनपेक्षा अधिक शेतकºयांना एकाच रोहित्रावरून वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी मीटरसाठी डिमांड भरून त्यांना आजपर्यंत वीज पुरवठा उपलब्ध झाला नाही, अशा शेतकऱ्यांना यानंतर पुढे उच्चदाब वाहिणीद्वारेच वीज पुरवठा केला जाणार आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच टप्प्याटप्प्याने प्रत्येक शेतकऱ्यांला वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Web Title: 671 Transformers for Agriculture Plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.