FIFA World Cup 2018 : विश्वचषकात व्हिडिओ असिस्टंट रेफ्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 07:33 PM2018-06-16T19:33:55+5:302018-06-16T19:33:55+5:30

प्रत्येक खेळ आता तंत्रज्ञानाशी जोडला गेला आहे. अत्याधुनिक प्रणालीचा वापर करीत खेळातील पारदर्शकता अधिक बळकट व्हावी, हा या मागचा उद्देश. फुटबॉल या खेळातही नवे नवे तंत्रज्ञान आले.

FIFA World Cup 2018: Video Assistant Referee in World Cup | FIFA World Cup 2018 : विश्वचषकात व्हिडिओ असिस्टंट रेफ्री

FIFA World Cup 2018 : विश्वचषकात व्हिडिओ असिस्टंट रेफ्री

Next

- सचिन कोरडे

प्रत्येक खेळ आता तंत्रज्ञानाशी जोडला गेला आहे. अत्याधुनिक प्रणालीचा वापर करीत खेळातील पारदर्शकता अधिक बळकट व्हावी, हा या मागचा उद्देश. फुटबॉल या खेळातही नवे नवे तंत्रज्ञान आले. सध्या सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात पहिल्यांदाच व्हिडिओ असिस्टंट रेफ्री (व्हीएआर) या प्रणालीचा वापर करण्यात आला.  शनिवारच्या सामन्यात या प्रणालीद्वारे फ्रान्सला आॅस्ट्रेलियाविरुद्ध पेनल्टी देण्यात आली.पेनल्टी द्यायची की नाही? याबाबत पंचांमध्ये साशंकता होती. 

‘क’ गटातील या सामन्यात रेफ्रीने स्पॉट किक दिली नाही; परंतु व्हीएआर अधिकाºयांनी समीक्षा केल्यानंतर निर्णय देत फ्रान्सला पेनल्टी जाहीर केली. यावर एंटोनी ग्रिजमानने फ्रान्सला १-० ने आघाडीवर नेले. त्यानंतर मात्र आॅस्ट्रेलियाने स्पॉट किकवर बरोबरीचा गोल नोंदवला. ही पेनल्टी रेफ्रीने दिली होती. 

प्रणालीबद्दल....

१) व्हिडिओ असिस्टंट रेफ्री ही प्रणाली सेरी ए आणि जर्मन बुंदेसलिगा येथे वापरण्यात आली होती. येथील यशस्वीतेनंतर फिफाने तिचा वापर कन्फेडरेशन चषकात केला आणि आता पहिल्यांदाच विश्वचषकातही ही प्रणाली वापरण्यात येत आहे.

२) गेल्या हंगामात एफए कपमध्ये या प्रणालीची चाचणी घेण्यात आली होती. 

३) मॉस्कोच्या व्हिडिओ आॅपरेशन रूममध्ये चार रेफ्री बसलेले असतात. स्टेडियमवरील प्रत्येक बारकावे ते स्क्रीनवर पाहात असतात. २३ वेगवेगळ्या अ‍ॅँगलच्या कॅमेºयांची मदत घेतली जाते. रेफ्री त्यांच्या रेडिओ मायक्रोफोनद्वारे प्रणालीच्या टीमसह थेट संवाद साधू शकतो.

४) गोल, पेनल्टी, रेड कार्ड आणि चुकीचे निर्णय यासाठी ही प्रणाली मदतशीर ठरते. 

Web Title: FIFA World Cup 2018: Video Assistant Referee in World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.