पोटासाठी फायदेशीर आहेत हे ३ खास सूप, जाणून घ्या फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 10:19 AM2018-10-20T10:19:35+5:302018-10-20T10:20:28+5:30

पोटाच्या वेगवेगळ्या समस्यांनी अनेकजण हैराण असतात. पोटदुखी, पोटात गॅस होणे, छातीत जळजळ होणे, ब्लोटिंग आणि पाईल्स अशा समस्या आहेत, ज्या आज कुणालाही भेडसावताना दिसतात.

Vegetable and potato soup for better stomach | पोटासाठी फायदेशीर आहेत हे ३ खास सूप, जाणून घ्या फायदे!

पोटासाठी फायदेशीर आहेत हे ३ खास सूप, जाणून घ्या फायदे!

Next

पोटाच्या वेगवेगळ्या समस्यांनी अनेकजण हैराण असतात. पोटदुखी, पोटात गॅस होणे, छातीत जळजळ होणे, ब्लोटिंग आणि पाईल्स अशा समस्या आहेत, ज्या आज कुणालाही भेडसावताना दिसतात. काही लोक यासाठी आयुर्वेदाचा आधार घेतात तर काही लोक वेगवेगळी औषधे घेतात. काहींना याचा फायदा होतो तर काहींना होत नाही. चला आज आम्ही तुम्हाला असे काही सूप सांगणार आहोत जे तुमच्या पोटासाठी फायदेशीर आहेत.  

गाजर आणि आल्याचा ज्यूस

पोटात गॅसची समस्या होत असेल किंवा पोट खराब झालं असेल तर या ज्यूसने ही समस्या दूर होऊ शकते. गाजरामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात, जे इम्यूनिटी मजबूत करतात. तर आल्यामध्ये फायोन्यट्रीन्ट्स सोबतच अॅंटी-इफ्लेमेट्री गुण असतात. ज्यूस तयार करण्यासाठी पाणी गरम करा, त्यात २ गाजर कापून आणि २ चमचे आल्याचा रस टाका. नंतर चवीनुसार मीठ टाकून हलक्या आचेवर २० ते २५ मिनिटे हे शिजू द्या. त्यानंतर मिक्सरमधून याचा ज्यूस काढा. 

कोथिंबीर आणि भाज्यांचा ज्यूस

लिंबू आणि कोथिंबीर पोटाच्या समस्येसाठी रामबाण उपाय मानले जातात. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतात जे इम्यूनिटीसाठी फायदेशीर असतात. याचा सूप तयार करण्यासाठी नॉन स्किट पॅनमध्ये तेल गरम करा आणि  त्यात २ चमचे आलं, २ चमचे हिरव्या मिरच्या टाका. आता यात अर्धा वाटी गाजर टाकून २ ते ३ मिनिटे उकळू द्या. आता त्यात दोन कप वेगवेगळ्या भाज्या, एक चमचा लिंबूचा रस आणि चवीनुसार मीठ टाका. आता हे मिश्रण ३ मिनिटांपर्यत शिजवा. यात कापलेली कोथिंबीर टाकून ज्यूसचं सेवन करा. 

तेजपत्ता, बटाटा आणि बडीशेपचा ज्यूस

जेवण झाल्यावर थोडी बडीशेप खाल्याने पचन चांगलं होतं. त्यासोबतच पोटातील सूज आणि गॅसची समस्याही याने दूर होते. याचं सूप तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करा आणि त्यात दोन चमचे बडीशेप, अर्धा कप कापलेलं गाजर, बटाटा आणि तेजपत्ता टाका. त्यानंतर मीठ आणि काळे मिरे टाका. हे मिश्रण हलक्या आचेवर शिजवा. त्यानंतर या ज्यूसचं सेवन करा. 

(टिप: वरील सूपचे किंवा ज्यूसचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण वरील काही पदार्थांची काहींना अॅलर्जीही होऊ शकते.)
 

Web Title: Vegetable and potato soup for better stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.