उन्हाळ्यासाठी फायदेशीर ठरते ग्रीन डाळ; जाणून घ्या रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 06:20 PM2019-04-03T18:20:18+5:302019-04-03T18:23:06+5:30

उन्हाळ्याला सुरुवात झाली असून उन्हाळ्यात कोणते पदार्थ खावे आणि कोणते खाऊ नये याबाबत अनेक लोकांना माहीत नसते. भारतामध्ये या सीझनमध्ये अनेक शाही विवाहसोहळे होतात.

Summer special green daal recipe in marathi | उन्हाळ्यासाठी फायदेशीर ठरते ग्रीन डाळ; जाणून घ्या रेसिपी

उन्हाळ्यासाठी फायदेशीर ठरते ग्रीन डाळ; जाणून घ्या रेसिपी

Next

उन्हाळ्याला सुरुवात झाली असून उन्हाळ्यात कोणते पदार्थ खावे आणि कोणते खाऊ नये याबाबत अनेक लोकांना माहीत नसते. भारतामध्ये या सीझनमध्ये अनेक शाही विवाहसोहळे होतात. जर तुम्ही हेल्दी डाएटबाबत जागरूक असाल तर तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी काही हेल्दी पदार्थ तयार करू शकता. काही लोकांना वाटते की, हेल्दी पदार्थ चवीष्ट नसतात. परंतु असं अजिबात नसतं. तुम्हाला आज आम्ही अशा एका पदार्थाबाबत सांगणार आहोत. जी हेल्दी असण्यासोबतच टेस्टीदेखील आहे. जर तुम्ही ही हेल्दी रेसिपी फॉलो करून ग्रीन डाळ तयार करू शकता. जाणून घेऊया समर स्पेशल ग्रीन डाळ तयार करण्याची हेल्दी रेसिपी...

ग्रीन डाळ म्हणजे काय?

ग्रीन डाळ ऐकल्यावर अनेकजणांना वाटतं की, ही मूगाची हिरवी डाळ आहे की काय? पण तसं अजिबात नाही. ग्रीन डाळ तयार करण्यासाठी चण्याची डाळ आणि हिरव्या भाज्यांमध्ये पालक एकत्र करा. ग्रीन डाळमध्ये तुम्ही दुधी भोपळाही एकत्र करू शकता. 

ग्रीन डाळ तयार करण्यासाठी साहित्य :

  • चण्याची डाळ 
  • पालक
  • जीरं 
  • हिंग 
  • कसूरी मेथी
  • हिरवी मिरची
  • कांदा 
  • आलं-लसणाची पेस्ट 
  • गरम मसाला
  • धने पावडर
  • दूध
  • तेल
  • मीठ चवीनुसार

 

ग्रीन डाळ तयार करण्याची रेसिपी :

- सर्वात आधी डाळ व्यवस्थित धुवून प्रेशर कुकरमध्ये दिड कप पाणी टाकून शिजवून घ्या. 

- एका पॅनमध्ये पाणी उकळून त्यामध्ये पालक टाकून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्या.

- पालक सुकवून त्याची ब्लेंडरमध्ये पेस्ट तयार करून घ्या. 

- नॉन स्टिक पॅनमध्ये तेल घेऊन गरम करा आणि त्यामध्ये जीरं, हिंग आणि कसूरी मेथी टाका. 

- या गोष्टी व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची. कांदा, आलं-लसणाची पेस्ट एकत्र करा. 

- त्यानंतर या मिश्रणात गरम मसाला, धने पावडर आणि मीठ एकत्र करून एक मिनिटासाठी शिजवून घ्या. 

- त्यानंतर पालक, दूध आणि अर्धा कप पाणी एकत्र करून 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवा. 

- त्यानंतर या मिश्रणात डाळ एकत्र करून 4 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घ्या. 

ग्रीन डाळ का ठरतं हेल्दी फूड?

ग्रीन डाळ एक हेल्दी रेसिपी आहे, जी हेल्दी फूड म्हणूनही ओळखली जाते. उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला प्रोटीन असलेले हेव्ही पदार्थ खाण्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर हा सर्वात उत्तम उपाय आहे. ग्रीन डाळीमध्ये मुबलक प्रमाणाक एनर्जी असते. एक वाटी ग्रीन डाळीमध्ये जवळपास 6 ग्रॅमपर्यंत प्रोटीन असतं. ग्रीन डाळीमध्ये मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेटही असतात. ग्रीन डाळीचे सेवन केल्याने व्हिटॅमिन ए आणि बी शरीराला मिळण्यास मदत होते. याव्यतिरिक्त ग्रीन डाळीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येतं. जे पोटाच्या समस्या दूर करण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं. ग्रीन डाळ खाल्याने आयर्न आणि कॅल्शिअमही मिळण्यास मदत होते. 

Web Title: Summer special green daal recipe in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.