ना मैदा, ना साखर तरीही बनवा भन्नाट केक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 03:15 PM2019-01-30T15:15:43+5:302019-01-30T15:19:41+5:30

मैदा, साखर आणि तत्सम वस्तू न वापरता घरगुती, पौष्टिक आणि चवदार केकची रेसिपी आम्ही घेऊन आलोय. तेव्हा हा केक नक्की ट्राय करा आणि घरच्यांना खुश करा.  

No Maida, No Sugar : Recipe of healthy wheat cake | ना मैदा, ना साखर तरीही बनवा भन्नाट केक 

ना मैदा, ना साखर तरीही बनवा भन्नाट केक 

googlenewsNext

पुणे : केक म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात चमक येते. अनेकदा मैदा, साखर बघून केक खाण्याचा मोह टाळला जातो. पण आता त्याची गरज नाही. मैदा, साखर आणि तत्सम वस्तू न वापरता घरगुती, पौष्टिक आणि चवदार केकची रेसिपी आम्ही घेऊन आलोय. तेव्हा हा केक नक्की ट्राय करा आणि घरच्यांना खुश करा.  

साहित्य :

  • गव्हाचे पीठ २ वाटी 
  • गूळ दीड वाटी 
  • बेकिंग पावडर १ चमचा 
  • एक अंडे किंवा दही एक वाटी 
  • दूध किंवा पाणी 
  • इसेन्स 
  • चॉकलेट पावडर आवडत असल्यास 
  • काजू, बदाम, मनुके, पिस्ता (बारीक तुकडे करून)

 

कृती :

  • गूळ बारीक करून त्यात गव्हाचे पीठ करून घ्या. 
  • या पीठात एक अंडे फेटून टाका. अंडे सुमारे १० मिनिटे एका दिशेने फिरवून घेऊन फेस येईपर्यंत फेटून घ्या. 
  • अंडे घ्यायचे नसल्यास वाटीभर दही फेटून घ्यावे. 
  • हे फेटलेले साहित्य एकत्र करून दाट मिश्रण करावे. मिश्रण फार पातळ करू नये. 
  • मिश्रण एकजीव करण्यासाठी हॅण्ड मिक्सर किंवा साध्या मिक्सरचा वापर करा. 
  • यात नंतर चॉकलेट पावडर आणि इसेन्स टाकून एकजीव करा. 
  • त्यात बेकिंग पावडर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करा. 
  • केक तयार करण्याच्या भांड्याला आतून व्यवस्थित तूप लावून घ्या. 
  • आता त्यात तयार मिश्रण घालून वरून काजू, बदाम आणि इतर ड्राय फ्रूट्सच्या मदतीने सजवा. 
  • आता हा केक १५ मिनिटे ओव्हनमध्ये बेक करा. 
  • किंवा गॅसवर जाड ताव ठेवून त्यावर केकचे भांडे झाकण ठेवून मंद आचेवर १५ ते १८ मिनिटे बेक करा. 
  • किंवा हे भांडे कुकरमध्ये ठेवून त्यात शिट्टी काढून १५ मिनिटे बेक करा. 
  •  वेळ संपल्यावर त्यात केकमध्ये सूरी टाकून पूर्ण तयार झाला की नाही हे तपासा. मिश्रण सुरीला चिकटल्यास ५ मिनिटे अधिक बेक करा. 
  • पौष्टिक, चवदार केक तयार.  

Web Title: No Maida, No Sugar : Recipe of healthy wheat cake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.