मुंबईत नाईट आऊटचा करताय प्लान, मग खवय्यांनो या हॉटेल्सना नक्की द्या भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 07:31 PM2018-03-15T19:31:58+5:302018-03-15T19:31:58+5:30

मुंबई दिवसभर व्यस्त असतेच मात्र असं असलं तरीही ती रात्रीचीही विश्रांती घेत नाही.

nightlife hotels in mumbai | मुंबईत नाईट आऊटचा करताय प्लान, मग खवय्यांनो या हॉटेल्सना नक्की द्या भेट

मुंबईत नाईट आऊटचा करताय प्लान, मग खवय्यांनो या हॉटेल्सना नक्की द्या भेट

googlenewsNext
ठळक मुद्दे मुंबईतील नाईट लाईफचं आकर्षण खवय्यांनी या ठिकाणांना नक्की द्या भेट नाईट लाईफचा अनुभव

मुंबई : कधीही विश्रांती न घेणारं शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबई दिवसभर व्यस्त असतेच मात्र असं असलं तरीही ती रात्रीचीही विश्रांती घेत नाही. मुंबईतील नाईट लाईफचा सर्वांनाच अनुभव घ्यायचा असतो. केवळ मुंबईकरच नाही तर परदेशी नागरिकांना येथील नाईट लाईफचं प्रचंड आकर्षण आहे. जाणून घेऊया नाईट आऊटसाठी मुंबईतील काही प्रसिद्ध ठिकाणं आणि हॉटेलबाबतची माहिती :-

1. बॅचलर्स ( मरिन लाईन्स) 

बॅचलर्स हे मरीन लाईन्स जवळील सर्वात प्रसिद्ध हॅाटेल आहे. बॅचलर्सची खासियत म्हणजे इथे मिळणारं चिली आइस्क्रीम. मिरचीची चव व ठसका दिलेल्या या आईस्क्रीमला खवय्यांची सर्वाधिक जास्त पसंती असते. त्याचसोबत आइस्क्रीम, ज्यूस आणि क्रिम मिल्कशेक्ससाठीही पर्यटकांची रात्रभर येथे गर्दी पाहायला मिळते. 

2.  भगवती - ( कांदिवली) 

मुंबईच्या उपनगरीय विभागातील कांदिवली येथे असलेलं भगवती हे हॅाटेल विविध शाकाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.  

3. भुक्कड ढाबा ( ओशिवारा) 

भुक्कड ढाबा हे अंधेरीमधील (पश्चिम) ओशिवारातील खवय्यांसाठीचे सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे खवय्यांसाठी नान आणि रोटीमध्ये विविध प्रकार चाखायला मिळतील.

4.  फिएस्टा बाईट्स ( प्रभादेवी) 

फिएस्टा बाईट्स हे हॅाटेल मेक्सिकन आणि इटालियन पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. शाकाहारी पदार्थांचे सर्वाधिक प्रकार येथे पाहायला मिळतात.   

5. आईस अँड रोल्स ( विलेपार्ले) 

आईस अँड रोल्समध्ये डेझर्ट, चॅाकलेट मिल्कशेक, ज्यूससाठी प्रसिद्ध आहे.

 

Web Title: nightlife hotels in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.