घरच्या घरी तयार करा हेल्दी ड्रायफ्रूट लस्सी; जाणून घ्या रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 07:35 PM2019-05-13T19:35:32+5:302019-05-13T19:37:35+5:30

उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला ममुबलक प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यामुळे पेय पदार्थांची मागणी वाढते. याव्यतिरिक्त लोकांचा असा प्रयत्न असतो की, अशा पेय पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे की, जे आपल्या आरोग्यासाठी खरचं फायदेशीर असतात.

Make such tasty and healthy dry fruit lassi at home know recipes | घरच्या घरी तयार करा हेल्दी ड्रायफ्रूट लस्सी; जाणून घ्या रेसिपी

घरच्या घरी तयार करा हेल्दी ड्रायफ्रूट लस्सी; जाणून घ्या रेसिपी

googlenewsNext

उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला ममुबलक प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यामुळे पेय पदार्थांची मागणी वाढते. याव्यतिरिक्त लोकांचा असा प्रयत्न असतो की, अशा पेय पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे की, जे आपल्या आरोग्यासाठी खरचं फायदेशीर असतात. पण अशातच आपल्यापैकी अनेकांना चवीशी अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नसतं. अशातच दह्यापासून तयार करण्यात आलेली लस्सी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. लस्सी प्यायल्याने कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस यांसारखी पोषक तत्व शरीराला मिळतात. लस्सीचे सेवन केल्याने उन्हाळ्यातही आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. आज अशीच एक लस्सी तयार करण्याची हटके रेसिपी सांगणार आहोत. जाणून घेऊया घरीच हेल्दी ड्राई फ्रूट लस्सी तयार करण्याची रेसिपी...

साहित्य : 

  • बर्फ
  • दही
  • कन्डेंस्ड मिल्क 
  • ड्रायफ्रुट्स (तुमच्या आवडीनुसार)
  • कुकीज 

 

कृती : 

- सर्वात आधी एका ब्लेंडरमध्ये वरील सर्व वस्तू एकत्र करून ब्लेंड करून घ्या. 
- त्यानंतर तयार मिश्रण एका ग्लासमध्ये काढून घ्या. 
- आता या लस्सीवर ड्रायफ्रुट्स टाकून गार्निश करा. 
- टेस्टी आणि हेल्दी ड्रायफ्रुट लस्सी तयार आहे.
- थिक आणि क्रीमी लस्सी तयार करण्यासाठी यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करू नका. जर तुम्हाला थिक लस्सी नको असेल तर लस्सी तयार करताना तुम्ही थंड पाणी वापरू शकता. 

लस्सी खाण्याचे आरोग्यदायी फायदे : 

1. उन्हापासून रक्षण

उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये जाणवणारी पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी लस्सीचं सेवन करणं आवश्यक असतं. लस्सी प्यायल्याने यामध्ये असणारे इलेक्ट्रोलाइट्स आणि पाणी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. एवढचं नाही तर शरीराची उष्णता कमी करण्यासाठीही मदत करते. 

2. पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी 

लस्सीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासोबतच पचनक्रिया मजबुत होण्यासाठीही मदत होते. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात बॅक्टेरिया असतात. जर तुम्हाला पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर लस्सी त्यावर गुणकारी ठरते.

3. अ‍ॅसिडीटीपासून सुटका होण्यासाठी 

मसालेदार पदार्थ किंवा बाहेरी पदार्थ खाल्याने अ‍ॅसिडिटीच्या समस्येचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यामध्ये अ‍ॅसिडीटीची समस्येचा त्रास आणखी वाढतो. लस्सी यावर अत्यंत परिणामकारक ठरते. लस्सी थंड असते त्यामुळे अ‍ॅसिडिटी, अपचन यांसारख्या समस्यांवर फायदेशीर ठरते. 

4. हाडांसाठी फायदेशीर 

लस्सीमध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी ही फायदेशीर ठरते. हाडांच्या समस्या दूर करण्यासाठी दररोज लस्सी पिणं फायदेशीर ठरतं. 

5. वजन कमी करण्यासाठी 

तुम्ही तुमच्या सतत वाढणाऱ्या वजनाने वैतागलेले असाल तर लस्सीचं सेवन करा. लस्सीमध्ये कॅलरी अत्यंत कमी प्रमाणात असतात आणि फॅट्सही नसतात. लस्सी प्यायल्याने शरीरातून फॅट्स निघून जातात. 

Web Title: Make such tasty and healthy dry fruit lassi at home know recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.