घरच्या घरी बनवा आइस्क्रीम; उन्हाळ्यात राहा Cooool

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 03:58 PM2018-04-02T15:58:20+5:302018-04-02T15:58:20+5:30

आइस्क्रीम करताना आपल्याला आइस्क्रीम बेस व्यवस्थित बनवता आला पाहिजे, म्हणून त्याची कृती समजावून घेणे आवश्यक आहे.

make ice-cream at your home | घरच्या घरी बनवा आइस्क्रीम; उन्हाळ्यात राहा Cooool

घरच्या घरी बनवा आइस्क्रीम; उन्हाळ्यात राहा Cooool

Next

साहित्यः ताजे दूध १ लीटर, साखर २०० ते २५० ग्रॅम, कॉर्नफ्लॉवर ३ टी स्पून, मिल्क पावडर ३ टी स्पून, जीएमएस व सीएमएस प्रत्येकी पाव चमचा, जिलेटीन १ सपाट टी स्पून 

कृतीः ताजे दूध तापत ठेवा. एका कपात पाऊण कप मिल्क पावडर, कॉर्नप्लॉवर, जिलेटीन व जीएमएस पावडर घाला. थंड दुधात त्याची पातळ पेस्ट बनवा. साखरेमध्ये सीएमएस पावडर मिसळा. दुधाला उकळी आल्यावर तयार केलेली पेस्ट त्यात घाला. १ ते २ मिनिटे शिजवा. सीएमएस मिसळलेली साखर त्यात घाला. गॅस बंद करा. साखर विरघळू द्या व दूध आपोआप थंड होऊ द्या. दूध पूर्णपणे थंड झाले की, मिक्सरमधून चांगले फेटून घ्या व ट्रेमध्ये ओतून फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवा. 

संकलनः उमेश कुलकर्णी
 

Web Title: make ice-cream at your home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न