मकर संक्राती स्पेशल : तिळाच्या या फायद्यांमुळे तिळगुळ खाणं ठरेल फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 01:26 PM2019-01-11T13:26:54+5:302019-01-11T13:28:25+5:30

तीळ दिसायला फार लहान असला तरी त्याचे अनेक फायदे आहेत. हाडांच्या मजबुतीसाठी तसेच दाट आणि काळ्या केसांसाठीही तीळ खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं.

Makar sankranti special know these healthy benefits of sesame seeds or tilgul | मकर संक्राती स्पेशल : तिळाच्या या फायद्यांमुळे तिळगुळ खाणं ठरेल फायदेशीर!

मकर संक्राती स्पेशल : तिळाच्या या फायद्यांमुळे तिळगुळ खाणं ठरेल फायदेशीर!

googlenewsNext

तीळ दिसायला फार लहान असला तरी त्याचे अनेक फायदे आहेत. हाडांच्या मजबुतीसाठी तसेच दाट आणि काळ्या केसांसाठीही तीळ खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. तसं पहायला गेलं तर तिळाचे तीन प्रकार आढळून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने पाढंऱ्या, काळ्या आणि लाल तीळांचा समावेश होतो. यापैकी पांढऱ्या तिळांचा आहारामध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात येतो. साधारणतः थंडीमध्ये तीळांचा समावेश जास्त करण्यात येतो. तीळ हा प्रामुख्याने उष्ण पदार्थ असल्यामुळे हिवाळ्यातील उष्ण वातावरणात शरीराला उष्णता देण्यासाठी तीळ उपयोगी ठरतात. तसेच नववर्षातील येणारा पहिला सण मकरसंक्रांत. यासाठीही घरोघरी तिळाचे लाडू तयार केले जातात. जाणून घेऊया तिळाचे फायदे...

कॅन्सरपासून बचावासाठी :

संशोधनानुसार, तिळामध्ये सेसमीन नावाचं एक अ‍ॅन्टीऑक्सिडंट आढळून येतं. जे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्याचं काम करतात. यामुळेच लंग कॅन्सर, पोटाचे कॅन्सर, ल्यूकेमिया, प्रोटेस्ट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर यांसारख्या कॅन्सरवर परिणामकारक ठरतात. 

थंडीमध्ये उष्णतेसाठी :

तीळ शरीराला उष्णता देण्यासाठी फायदेशीर ठरतात. तिळामध्ये निसर्गतः उष्ण गुणधर्म असतात. त्यामुळे अनेकदा हिवाळ्यामध्ये आहारात तिळाचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात येतो. तीळ बारिक करून खाल्याने बद्धकोष्टाची समस्या दूर होते. थंडीमध्ये शरीराला उष्णता देण्यासाठी गुळ आणि तीळ एकत्र करून त्याचे लाडू तयार करण्यात येतात. 

मानसिक आरोग्य राखण्यासाठी :

तीळामध्ये काही अशी तत्व आणि व्हिटॅमिन्स आढळून येतात, जे ताण आणि डिप्रेशन कमी करण्यासाठी मदत करतात. माउथ अल्सरवरही तीळ परिणामकारक ठरतात. तिळाच्या तेलामध्ये सैंधव मीठ एकत्र करून लावल्याने ही समस्या दूर होण्यास मदत होते. 

सौंदर्य वाढविण्यासाठी :

तिळाचे तेल त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये त्वचेसाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व आढळून येतात. शरीराच्या कोणत्याही भागावर किंवा एखाद्या ठिकाणी भाजल्यावर तीळ बारिक करून तूप आणि कापूर एकत्र करून तयार पेस्ट त्यावर लावल्याने आराम मिळतो. तसेच जखम लगेच ठिक होण्यासही मदत होते. 

हेल्दी हार्ट :

तिळामध्ये अस्तित्वात असलेले पौषक तत्व कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक आणि सेलेनियम इत्यादी हृदयासाठी फायदेशीर ठरतात. तसेच जेवण तयार करताना तिळाच्या तेलाचा वापर केल्याने हृदयाचे आरोग्य चागले राखण्यासही मदत होते. 

कोरडा खोकला असल्याने तीळ आणि साखरेचे पाण्यासोबत सेवन केल्याने अनेक फायदे होतात. याव्यतिरिक्त तिळाचे तेल लसणासोबत कोमट गरम करून कानामध्ये टाकल्याने कानाला होणाऱ्या वेदनांपासून सुटका होते. 

Web Title: Makar sankranti special know these healthy benefits of sesame seeds or tilgul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.