ठळक मुद्देरात्री भटकणारी ही तरुण मंडळी खास खवय्येगिरी करायलाच बाहेर पडतात.सध्या नाईटलाईफचा जमाना आहे. सध्यातरी आपल्याकडे हे तितकंस स्विकारलं गेलं नाहीये. मुंबईतील अनेक हॉटेल्स अशा खवय्येगिरी तरुणांसाठी चालू असतात.

मुंबई : सध्या नाईटलाईफचा जमाना आहे. सध्यातरी आपल्याकडे हे तितकंस स्विकारलं गेलं नसलं तरीही अनेक तरुण मंडळी रात्रीचं भटकायला बाहेर जातात. मुंबई फक्त रात्री 2 ते 3 तासच शांत दिसते असं म्हणायचे, मात्र आता मुंबई केव्हाच झोपत नाही असंही म्हटलं जातं. रात्री भटकणारी ही तरुण मंडळी खास खवय्येगिरी करायलाच बाहेर पडतात. मुंबईतील अनेक हॉटेल्स अशा खवय्येगिरी तरुणांसाठी चालू असतात. अशाच काही खास रात्रीच्या हॉटेल्सविषयी.

अंडा मेंटल

या हॉटेलच्या नावावरुनच तुम्हाला कळलं असेल की इकडे अंड्याचे पदार्थ फार प्रसिद्ध असतील. अंधेरीतील आझाद नगरमध्ये हे हॉटेल आहे. रात्री 3.30 पर्यंत या हॉटेलकडून होम डिलिव्हरीसुद्धा केली जाते. 

बॅचलर्स

चिली आईस्क्रीमसाठी प्रसिद्ध असलेलं बॅचलर हा स्टॉल रात्रीच्या भटक्या मित्रांमध्ये फार फेमस आहे. चिली आईस्क्रीम खाण्यासाठी लोक इकडे लांबून लांबून येत असतात. रात्री 1.30 पर्यंत तुम्हाला इकडे विविध प्रकारच्या आईसक्रीम मिळू शकतील.

बडेमियाँ

कुलाब्यातील बडेमिया हे हॉटेल मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. रात्री तीन वाजपर्यंत सुरू असलेलं बडेमिया हे हॉटेल बैदा रोलसाठी फार प्रसिद्ध आहे. तुम्ही जर तुमची कार घेऊन गेला असाल तर तुमच्या कारपर्यंत फूडसर्व्हिस केली जाते.

भुक्कड ढाबा

ओशिवरामध्ये असलेला भुक्कड ढाबाही खवय्यांमध्ये फार प्रसिद्ध आहे. जरा क्रिस्पी काहीतरी खायचं असेल तर भुक्कड ढाबा बेस्ट आहे. सकाळी 5 वाजेपर्यंत हे हॉटेल सुरू असतं, त्यामुळे भल्यापहाटे जर तुम्ही उठत असाल तर तुमचा सकाळचा नाश्ताही इकडे होऊ शकतो. 

एगिटेरिअन

तुम्ही व्हेजिटेरिअन ऐकलं असेल पण एगिटेरिअन थोडंसं हास्यास्पद वाटतंय ना. जुहू येथे असणारं एगिटेरिअन हे हॉटेल अंड्यापासून बनवण्यात येणार्‍या विविध पदार्थांसाठी फार प्रसिद्ध आहे. तसंच नॉर्थ इंडियन पदार्थांसाठीही इथे मोठी रांग असते. 

तय्याब किचन

तय्याब किचन हे अंधेरीतील सगळ्यात प्रसिद्ध हॉटेल आहे असं म्हटलं जातं. क्वाालिटी आणि क्वान्टिटीमुळे हे हॉटेल खवय्यांना आवडतं. अगदी मध्यरात्रीही तुम्हाला इकडे ताजं जेवण मिळेल. 

दि नाईट चुल्हा

या हॉटेलच्या नावावरुनच तुम्हाला कळलं असेल की हे हॉटेल केवळ रात्रीसाठीच असेल. सायंकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हे हॉटेल सुरू असतं. पण या ठराविक काळातच हे हॉटेल भरपूर कमवतं.

अंडा अपना अपना

अंदाज अपना अपना हा चित्रपट तुम्हाला माहित असेलच, याच चित्रपटाच्या नावावरून अंडा अपना अपना असं या हॉटेलचं नाव ठेवण्यात आलंय. अंधेरीतल्या आझाद नगरमध्ये हे हॉटेल आहे. रात्री 3.30 वाजेपर्यंत मुंबईभर कुठेही घरपोच डिलिव्हरीही केली जाते. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.